लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाचे उमरखेड ते महागाव दरम्यानचे काम अत्यंत संथगतीने होत आहे. ठिकठिकाणी गोदकाम असल्याने या मार्गावर अपघात नित्याचीच बाब झाली आहे. प्रशासन व कंत्राटदार कंपनी या सर्व प्रकाराकडे डोळे मिटून बघत आहे.महामार्गासाठी उमरखेड ते महागाव दरम्यान दुतर्फा रस्ता खोदण्यात आला. आता पावसामुळे तेथे चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. वाहनधारकांना चिखलातून रस्ता पार करताना कसरत करावी लागत आहे. कंत्राटदार कंपनी गेल्या काही महिन्यांपासून या अंतरामध्ये अतिशय संथगतीने काम करीत आहे. ऐन पावसाळ्यात रस्त्यावर मोठे खड्डे पडले असताना ते बुजवण्याचे सौजन्यही दाखविले जात नाही. परिणामी वाहनधारकांचे दररोज अपघात होत आहे. त्यात जीव हानीसोबतच वाहनांचे नुकसान होत आहे.चिखलाच्या साम्राज्यामुळे जड वाहनांचे अपघात होत असल्याने रस्त्यावरील प्रवास डोकेदुखी ठरत आहे. एखाद्या जड वाहनाचा अपघात झाल्यास, तास न् तास वाहतूक ठप्प होत आहे. महागाव ते उमरखेड या २५ किलोमीटर अंतरात कित्येक ठिकाणी काम अर्धवट सोडण्यात आले.कंपनीत अंतर्गत वादरस्ता खोदून ठेवल्यामुळे महामार्गावर चिखलाच्या साम्राज्यातून वाहनधारकांना मार्ग शोधत जावे लागते. मनुष्य हानी व वाहनाचे मेंटनस, असा दुहेरी फटका वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. यामुळे केंद्र शासनाविषयी प्रचंड रोष निर्माण झाला आहे. रस्ता बांधकाम कंपनीच्या अंतर्गत कलहामुळे रस्त्याचे काम गेल्या काही महिन्यांपासून संथगतीने सुरू असल्याची माहिती कंपनीच्या सूत्रांनी दिली. यात वाहनधारक संकटात सापडले आहे.
महामार्गाचे काम कासवगतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 22:03 IST
नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाचे उमरखेड ते महागाव दरम्यानचे काम अत्यंत संथगतीने होत आहे. ठिकठिकाणी गोदकाम असल्याने या मार्गावर अपघात नित्याचीच बाब झाली आहे. प्रशासन व कंत्राटदार कंपनी या सर्व प्रकाराकडे डोळे मिटून बघत आहे.
महामार्गाचे काम कासवगतीने
ठळक मुद्देनागपूर-तुळजापूर : महागाव ते उमरखेडदरम्यान दररोज अपघात, चालक त्रस्त