शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

वर्क ऑर्डर मिळूनही करता येणार नाही कामे, जाणून घ्या कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2024 18:08 IST

आचारसंहिता समितीचा 'वॉच' : कंत्राटदारांना करावी लागणार प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली आहे. या काळात आचारसंहितेचा भंग होणार नाही, यासाठी प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. आचारसंहितेत विकासकामे रखडली जाऊ नये, यासाठी आवश्यक त्या कामांची प्रशासकीय मान्यता घेत वर्क ऑर्डर काढण्यात आल्या. मात्र, कंत्राटदारांनी तत्काळ कामे सुरू केली नाही. आता आचारसंहिता लागू असल्याने कंत्राटदारांना या कालावधीत कामे करता येणार नाही. आचारसंहिता समितीचाही वॉच राहणार आहे.

लोकसभा निवडणूक काळात विकासकामांना मोठ्या प्रमाणात ब्रेक बसला होता. जून महिन्यात आचारसंहिता संपताच कामाचा सपाटा सुरू झाला. त्याला पाच महिने होत नाही तोच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची भीती नेते मंडळीसह प्रशासनात सतावत होती. कामे मार्गी लावण्यासाठी लोकप्रतिनिधींकडून आग्रह धरला गेला. यामुळे आचारसंहितेपूर्वी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग क्रमांक एक व दोनकडून विकासकामांच्या वर्क ऑर्डर काढण्यात आल्या. वर्क ऑर्डर मिळताच कंत्राटदार बिनधास्त झाले. आता कधीही कामे करता येईल, असे त्यांना वाटू लागले.

काहींनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. तर, काहींनी आज-उद्यावर जोर दिला आणि आचारसंहिता लागू झाली. ज्यांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवातच केली नाही, त्यांना आता विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. या कालावधीत कामे सुरू झाल्यास आचारसंहिता समितीकडून कारवाई करण्यात येणार आहे. याशिवाय कोणत्याही कामाला प्रशासकीय मान्यता देता येणार नाही.

विधानसभा निवडणुकीत कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांना ब्रेक लागला आहे. ही कामे निवडणुकीची आचारसंहिता संपल्यावरच करता येणार आहे. नागरिकांनाही यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे.

प्रशासकीय मान्यताही नाही २२ ऑक्टोबरपासून निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. यामुळे या कालावधीत आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी लागणार आहे. कोणत्याही प्रकारच्या कामांना प्रशासकीय मान्यता देता येणार नाही. प्रशासकीय मान्यता झाली असल्यास वर्क ऑर्डर देता येणार नाही.

काय दिले निर्देश ज्या कामांची वर्क ऑर्डर देण्यात आली आहे. परंतु, प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली नाही, अशी कामेही सद्यःस्थितीत सुरू करू नये, असेही निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी दिले.

"वर्क ऑर्डर मिळाल्यावर ज्यांनी कामांना सुरुवात केली अशी कामे करता येणार आहे. मात्र, ज्यांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवातच केली नाही, त्यांना काम करता येणार नाही. तशा सूचना करण्यात आल्या आहेत. आचारसंहिता कालावधीत कामे सुरू केल्यास आचारसंहिता समितीकडून कारवाई करण्यात येईल." - मंदार पत्की, मुख्य कार्यकारी अधिकारी, यवतमाळ,

टॅग्स :Code of conductआचारसंहिताYavatmalयवतमाळ