शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महिलांच्या कार्यामुळे विकासाला हातभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 21:55 IST

आज प्रत्येक क्षेत्रात महिला अग्रस्थानी आहे. बचतगटाच्या माध्यमातून गाव पातळीवर एक चळवळ तयार होत आहे. महिलांच्या कार्यक्षमतेने राष्ट्र विकासाला हातभार लागणार आहे.

ठळक मुद्देमाधुरी आडे : चिखलवर्धा, इंजाळा, बोरीच्या गटांची बाजी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आज प्रत्येक क्षेत्रात महिला अग्रस्थानी आहे. बचतगटाच्या माध्यमातून गाव पातळीवर एक चळवळ तयार होत आहे. महिलांच्या कार्यक्षमतेने राष्ट्र विकासाला हातभार लागणार आहे. यातून गावांचा विकास घडेल, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी अनिल आडे यांनी केले.समृद्धी प्रदर्शनाच्या समारोप प्रसंगी त्या बोलत होत्या. गत पाच दिवसांपासून येथील समता मैदानात महिला बचतगटांच्या उत्पादित वस्तूंचे प्रदर्शन सुरू आहे. या प्रदर्शनाच्या समारोपीय कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलताना माधुरी आडे म्हणाल्या, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि शेती जर मजबूत करायची असेल, तर जोडधंदा महत्त्वाचा आहे. त्यामुळे बचतगटांची चळवळ प्रेरणा देणारी ठरणार आहे. यापेक्षाही महिलांनी उत्तम कामगिरी करण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रमुख पाहुण्या म्हणून समाजकल्याण सभापती प्रज्ञा भूमकाळे, नेरच्या सभापती मनीषा गोळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी डॉ. दीपक सिंगला, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेश कुळकर्णी, समन्वयिका सविता राऊत उपस्थित होत्या.डॉ. दीपक सिंगला म्हणाले, महिलांनी पुढे यावे, प्रशासन त्यांच्या मदतीसाठी तयार आहे. गरिबी संपवायची असेल, तर कुणाची वाट बघू नका. स्वत:च पुढाकार घेऊन कामाला लागा. विकास आपोआप घडेल, असे ते म्हणाले. या कार्यक्रमात प्रत्येक बचत गटाला प्रशस्तीपत्र देण्यात आले. उत्तम कामगिरी करणाऱ्या आणि सर्वाधिक उलाढाल करणाऱ्या गटांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. त्यात घाटंजी तालुक्यातील चिखलवर्धाच्या आदर्श आदिवासी महिला बचतगटाला प्रथम क्रमांक मिळाला. या गटाने मध विक्रीकरिता आणले होते. इंजाळा येथील जिजाऊ स्वयंसहायता बचतगटाने सोयाबीनपासून तयार केलेल्या वस्तू विक्रीस आणल्या होत्या. या गटाला दुसरा क्रमांक मिळाला. बोरीअरबच्या अन्नपूर्णा महिला बचतगटाला तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. संचालन साधना दुबे यांनी केले.रोपवाटिकेने वेधले लक्षप्रदर्शनात विविध प्रकाराचे पुष्प, वनऔषधी आणि विविध वृक्षांच्या रोपवाटिकेचा समावेश होता. रोपवाटिका आणि पुष्पांचा समावेश असलेल्या स्टॉलने प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. दारव्हा तालुक्यातील कामठवाडा येथील या बचतगटाने वृक्ष संवर्धनाचा संदेश दिला.