शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

उमरखेडमध्ये महिला सुरक्षा जनजागृती रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 23:33 IST

येथील पोलीस ठाण्याच्यावतीने पोलीस स्थापना दिनानिमित्त शहरातून महिला सुरक्षा जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीत शहरातील विविध शाळांच्या विद्यार्थिनींसह पोलीस बँड पथकाने सहभाग घेतला.

ठळक मुद्देविद्यार्थिनींचा सहभाग : पोलीस बॅन्ड पथकाचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : येथील पोलीस ठाण्याच्यावतीने पोलीस स्थापना दिनानिमित्त शहरातून महिला सुरक्षा जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीत शहरातील विविध शाळांच्या विद्यार्थिनींसह पोलीस बँड पथकाने सहभाग घेतला.पोलीस स्टेशनतर्फे आयोजित या रॅलीत विद्यार्थिनींनी नऊवारी पातळ व डोक्याला फेटे बांधून सहभाग नोंदविला. डफडीच्या तालावर काही विद्यार्थिनींनी लेझिम नृत्य सादर केले. स्त्री भ्रूणहत्त्या करू नका, बेटी बचाव बेटी जगाव आदींची फलके विद्यार्थिनींनी दर्शविली. विद्यार्थिनींनी महिला सुरक्षा जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.या रॅलीत जिल्हा पोलिसांचे बँड पथक सहभागी झाले होते. त्यांनी ‘हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र पे्रषिकांचे’, ‘सारे जहाँ से अच्छा, हिंदोस्ता हमारा’ आदी देशभक्तिपर गीते सादर केली. प्रा.अनिल काळबांडे व नंदा गायकवाड यांनी महिला सुरक्षा जनजागृतीपर गीते सादर केली.शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण केल्यानंतर पोलीस ठाण्यात रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी अ‍ॅड.पूजा संस्थानिके यांनी महिला विषयक कायद्यांवर विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. अ‍ॅड.कलंत्री, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार, गटविकास अधिकारी जयश्री वाघमारे यांनीही विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. याप्रसंगी डॉ.वंदना कदम, सरोज देशमुख, नगरसेविका कविता मारोडकर, सत्यनिर्मिती महिला मंडळाच्या शबाना खान, राखी मगरे, सीमा खंदारे, अनुसया महिला भजनी मंडळ, प्रा.निलोफर पठाण, रेखा भुते, अरुणा राठोड, वंदना पवार आदींसह महिला विद्यार्थिनी उपस्थित होत्या. संचालन ठाणेदार हनुमंतराव गायकवाड यांनी केले. आभार अलका मुडे यांनी मानले.