शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

रोजगारासाठी महिलांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 22:13 IST

नगरपरिषदेची हद्दवाढ केल्यामुळे अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. यवतमाळ पालिकेत लगतच्या सात ग्रामपंचायती समाविष्ट झाल्या आहेत. आता त्या गावांना अ दर्जाच्या पालिकेचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे येथे रोजगार हमी योजनाच राबविता येत नाही.

ठळक मुद्देरोहयोची बांधकामे बंद : नगर परिषद हद्दवाढीने हिरावला रोजगार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नगरपरिषदेची हद्दवाढ केल्यामुळे अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. यवतमाळ पालिकेत लगतच्या सात ग्रामपंचायती समाविष्ट झाल्या आहेत. आता त्या गावांना अ दर्जाच्या पालिकेचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे येथे रोजगार हमी योजनाच राबविता येत नाही. त्यामुळे अनेक महिला व युवकांचा रोजगार हिरावला आहे. येथे राहेयोतून कामे उपलब्ध करावीत यासाठी पिंपळगाव येथील महिलांनी सोमवारी आंदोलन केले.नगपरिषदेत पिंपळगाव, मोहा, लोहारा, वाघापूर, वडगाव, उमरसरा, भोसा या ग्रामपंचायतींचा समावेश झाला. त्यामुळे ग्रामीण भागात राबविली जाणाऱ्या रोजगार हमी योजनेतील कामे बंद झाली. परिणामी परंपरागत काम करणाऱ्या महिला व पुरूषांवर बेरोजगारीची कुºहाड कोसळली. सलग तीन वर्षापासून येथे रोजगार हमी योजनेतून एकही काम देण्यात आले नाही. रोहयोचे हक्काचे काम का मिळत नाही, याची विचारणा करण्यासाठी महिला रोहयो कार्यालया गेल्या. तेथे त्यांना सांगण्यात आले की, या सातही ग्रामपंचायतींना आता अ दर्जाच्या नगपरिषद क्षेत्रात समाविष्ट झाल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागासाठी असलेले ही योजना येथे राबविता येणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले. हद्द वाढ झाल्याने नवीन क्षेत्रात सुविधा कोणत्याच मिळाल्या नाहीत उलट, हातचे काम गेल्याने उपासमारीची वेळ आल्याचे या महिलांनी सांगितले.आता शहरातील बांधकाम ठप्प पडली आहेत. रेतीच उपलब्ध नसल्याने बांधकाम नाही. परिणामी बांधकामावर काम करणाºया मजूरांच्या हाताला कोणतचे काम नाही. घरची चूल पेटत नसल्याने या मजुरांनी रोजगार हमी योजनेच्या कामांची मागणी केली. मात्र येथेही कायदेशीर बाबींचा अडसर आला आहे. अशा स्थितीत रोजगार नसल्याने या महिलांपुढे आंदोलना शिवाय कोणताच पर्याय नाही. पिंपळगाव येथील विसावा कॉलनीतील महिलांनी आंदोलन सुरू केले आहे. त्यांना वेळेत रोजगार उपलब्ध करून न दिल्यास दररोज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले जाईल, असा इशारा या महिलांनी दिला आहे. रोजगारासाठी त्यांनी तिरंगा चौकात मंगळवारी धरणे दिले.यावेळी छबु जाधव, अंजु राऊत, कोमल मालाधारी, रमा बावणे, मंदा नागदेवते, कविता खडसे, शिला वानखेडे, लिला गवई, अनिता पाचलकर, बेबी नागपूरे, अर्चना बुटले, शोभा जामुळकर, सविता टिके, सारिका फटे, सविता देशमुख, सोनाबाई मात्रे, सुनंदा मात्रे, मंदा गेडाम रेखा नंदे, ज्योती नंदे, रंजना पिल्लारे, सुनिता माने, दुर्गा तुपट, सुनंदा आडे यांच्यासह ७० महिला या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका