शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

महिलांची वीज वितरण कार्यालयावर धडक

By admin | Updated: June 9, 2014 23:51 IST

सततचे भारनियमन, वीज पुरवठा खंडीत होणे, तीन-तीन दिवस अंधारात दिवस काढावे लागणे, वीज कंपनीच्या अधिकारी, कर्मचार्‍यांकडून उर्मट वागणूक मिळणे या सर्व बाबींना कंटाळून सोमवारी येळाबारा

घाटंजी : सततचे भारनियमन, वीज पुरवठा खंडीत होणे, तीन-तीन दिवस अंधारात दिवस काढावे लागणे, वीज कंपनीच्या अधिकारी, कर्मचार्‍यांकडून उर्मट वागणूक मिळणे या सर्व बाबींना कंटाळून सोमवारी येळाबारा येथील महिलांनी वीज वितरणच्या कार्यालयावर धडक देऊन सहायक अभियंता प्रशांत अंबाडकर यांना घेराव घातला. येळाबारा येथील नागरिक तब्बल तीन दिवस अंधारात होते. भारनियमनाव्यतिरिक्त वारंवार वीज पुरवठा खंडीत होतो. तेंव्हा हा त्रास चार दिवसात बंद न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला .परंतु वीज वितरण कंपनीकडून आपल्या कामात कोणतीही सुधारणा करण्यात आली नाही. ग्रामीण जनता वीज बिल भरत नाही का, असा सवाल या महिलांनी केला. येळाबारा येथे वीज कंपनीचा  लाईनमनच नाही. एखाद्याच्या घरची लाईन खांबावरून कार्बन चढल्यामुळे बंद झाल्यास ती सुरू करण्यासाठी लाईनमन शंभर रुपयांची मागणी करतात, आदी व्यथा महिलांनी यावेळी मांडल्या. यावेळी अंबाडकर यांनी कनिष्ठ अभियंता खर्चे यांना बोलावून वीद्युत पुरवठय़ाचे काम चार दिवसात करून देण्याचे आश्‍वासन दिले. वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठांनी २0११ साली येळाबारा फिडरच्या गावठानचे काम नागार्जूना कंपनीला दिले होते. या कंपनीने हे काम आजपर्यंत पूर्ण केले नाही. सदर काम या कंपनीकडून काढून घेऊन दुसर्‍या कंपनीला द्यावे व आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी येळाबारा येथील महिलांनी केली. (तालुका प्रतिनिधी)