शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

महिलांचा दारूबंदी महामोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 22:08 IST

स्वामिनीच्या नेतृत्वात जिल्ह्यातील विविध संघटनांनी एकत्र येत संपूर्ण जिल्ह्यात दारूबंदी करण्यात यावी, अशी मागणी लावून धरली. शुक्रवारी जिल्हाभरातून आलेल्या मोर्चेकरी महिलांनी समता मैदान फुलून गेले होते. ‘वारे सरकार तेरा खेल सस्ती दारू महंगा तेल’ असे नारे देत विविध मार्गावरून फिरत मोर्चाचा समारोप समता मैदानावर झाला.

ठळक मुद्देहजारोंचा आक्रोश : वारे सरकार तेरा खेल, सस्ती दारू महेंगा तेल

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : स्वामिनीच्या नेतृत्वात जिल्ह्यातील विविध संघटनांनी एकत्र येत संपूर्ण जिल्ह्यात दारूबंदी करण्यात यावी, अशी मागणी लावून धरली. शुक्रवारी जिल्हाभरातून आलेल्या मोर्चेकरी महिलांनी समता मैदान फुलून गेले होते. ‘वारे सरकार तेरा खेल सस्ती दारू महंगा तेल’ असे नारे देत विविध मार्गावरून फिरत मोर्चाचा समारोप समता मैदानावर झाला. यावेळी मोर्चेकऱ्यांनी सरकार विरोधात आवाज उठविला. या मोर्चामध्ये अपंगांसह, तालुक्याच्या ठिकाणांहून पायी आलेल्या वृद्ध महिलांनी हिरीरीने सहभाग नोंदविला.दारूबंदीच्या मागणीसाठी स्वामिनी संघटना चार वर्षांपासून आंदोलने करीत आहे. शुक्रवारी स्वामिनीसोबत विविध संघटनांनी एकत्र येत महामोर्चा काढला. गडचिरोली जिल्ह्यात मुक्तीपथ प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन आणि सर्च संस्था यांनी दारूनियंत्रणाचा पथदर्शी प्रकल्प प्रभावीपणे राबविला. त्या धर्तीवर यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदीनंतर पुढील दारूनियंत्रणासाठी मोहीम राबविण्यात यावी, अशी मागणी मोर्चेकºयांनी केली.मोर्चाच्या अग्रस्थानी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा फोटो होता. त्यामागे गरुदेव सेवा मंडळाची टिम होती. त्यामागे दारूबंदीचे फलक घेऊन जाणाºया महिला होत्या. ‘वारे सरकार तेरा खेल सस्ती दारू महंगा तेल’, ‘या सरकारचे करायचे काय, उलटे डोके वरती पाय’ अशा घोषणा देण्यात आल्या. या मोर्चामध्ये १५० किमी अंतरावरून पायपीट करीत आलेल्या महिलांनी सहभाग नोंदविला होता. यावेळी ११ मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले. यावेळी मराठा सेवा संघ, प्रहार, गुरूदेव सेवा मंडळ, शेतकरी वारकरी संघटना, पोलीस पाटील संघटना, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघ, संभाजी ब्रिगेड, इंडियन मेडिकल असोसिएशन, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गट प्रवर्तक संघटना, महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना, आॅल इंडिया बंजारा सेवा संघ, प्रजापिता ब्रह्मकुमारी इश्वरी विश्व विद्यालय, जिजाऊ ब्रिगेड, अंगणवाडी बालवाडी कर्मचारी संघटना, आयटक, बिरसा ब्रिगेड, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद, जमाते इस्लाम हिंद, अल्कोहोलीक एनॉनिमस, गणेश दुर्गा मंडळ, अस्तित्व फाऊंडेशन, माळी समाज, माहेश्वरी मंडळ, बचतगट आणि विविध सामाजिक गृपचा आंदोलनामध्ये सहभाग होता.दारूबंदीसाठी टॉवरवर इसमाची ‘वीरूगिरी’यवतमाळ : शहरात स्वामिनी दारूबंदी संघटनेने मोर्चाचे आयोजन केले होते. ग्रामीण भागातून मोठ्यासंख्येने महिला आल्या होत्या. हे दृष्य पाहून शुक्रवारी दुपारी नेताजीनगर येथील इसमानेही दुरसंचार विभागाच्या टॉवरवर ठाण मांडले. मोर्चाच्या बंदोबस्ता असलेल्या पोलिसांची ऐन वेळी तारांबळ उडाली. त्यांनी घटनास्थळ गाठून आंदोलकाशी मोबाईलद्वारे चर्चा केली. विलास तुकाराम पवार (५२) रा. नेताजीनगर असे विरूगीरी करणाऱ्या इसमाचे नाव आहे. विलासने नेजातीनगर परिसरातील दारू भट्टी बंद व्हावी या मागणीसाठी थेट टॉवर ठिय्या दिला. टॉवरवर कोणीतरी चढल्याचे दिसातच परिसरात बघ्याची मोठी गर्दी जमा झाली. शहर ठाण्याच्या शोध पथकाने घटनास्थळ गाठले. सहायक निरीक्षक मिलन कोयल यांनी दूरध्वनीवरून चर्चा करून त्याला खाली उतरवले.

टॅग्स :Morchaमोर्चाliquor banदारूबंदी