शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

जेवणातून महिला, बालकांना विषबाधा, ५० महिलांसह बालकांची प्रकृती खालावली, सवना ग्रामीण रुग्णालयात उपचार

By रवींद्र चांदेकर | Updated: October 25, 2023 21:28 IST

Yavatmal News: महागाव  तालुक्यातील आमणी (खुर्द) येथील ५० पेक्षा अधिक महिला व बालकांना अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री घडली. लक्ष्मीच्या जेवणातून ही विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

- रवींद्र चांदेकरयवतमाळ - महागाव  तालुक्यातील आमणी (खुर्द) येथील ५० पेक्षा अधिक महिला व बालकांना अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री घडली. लक्ष्मीच्या जेवणातून ही विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बाधित महिला व बालकांना तातडीने खासगी दवाखाने, येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सवना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

उपचारानंतर सर्व विषबाधित महिला व बालकांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. प्राप्त माहितीनुसार आमणी (खुर्द) येथील महिलांना मंगळवारी रात्री ८:०० वाजेच्या सुमारास मळमळ, उलटी, जुलाब, भोवळ आणि तीव्र पोटदुखी, अशी लक्षणे जाणवू लागली. काही बालकांमध्येही लक्षणे आढळली. त्यानंतर आमणी गावात एकच धावपळ सुरू झाली. बाधित रुग्णांना मिळेल त्या वाहनाने उपचारासाठी महागाव येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले.

रात्री बहुतांश दवाखाने बंद असल्याने रुग्णांना महागाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात, तसेच सवना येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. दूषित अन्नातून किंवा दूषित पाण्यातून महिला व बालकांना विषबाधा (फूड पॉयझनिंग) झाल्याचा निष्कर्ष डॉक्टरांनी काढला. बाधित रुग्णांमध्ये संगीता आडेकर, स्वाती शिंदे, कमल बेद्रे, लक्ष्मी चिरंगे, प्रिया बेले, अश्विनी बेले, प्रणव खोकले, शारदा खोकले, वेदिका खोकले, सुनीता पुंडे, सुनीता भलगे, कुणाल मेतकर, सुनीता वानखेडे, ललिता वाडेकर, महानंदा मोरे, शारदा सरनाटे, सारिका सरनाटे, अश्विनी सरनाटे, मारुती सरनाटे, ताईबाई काळबांडे, सलोनी मोरे, सविता मन्ने, पूजा मन्ने, पद्मिना मन्ने, उषा शिंदे, अनुसया नरवाडे, पुण्यरथा रणमले यांच्यावर उपचार करण्यात आले.

दूषित अन्न, पाण्यातून झाला प्रकार दरम्यान, या घटनेला फूड पाॅयझनींग म्हणता येणार नाही, असे सवना ग्रामीण रुग्णालयाचे डाॅ. प्रीतेश दुधे यांनी सांगितले. दूषित पाणी किंवा दूषित अन्नातून हा प्रकार झाला असावा असा अंदाज त्यांनी वर्तविला. सर्वांची प्रकृती चांगली असल्याचेही त्यांंनी स्पष्ट केले.

टॅग्स :food poisoningअन्नातून विषबाधाYavatmalयवतमाळ