शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी महिला उतरल्या रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 23:42 IST

शहराच्या बहुतांश भागामध्ये महिनाभरापासून नळाला पाणीच आले नाही. यामुळे विविध भागातील महिला संतप्त होऊन रस्त्यावर उतरल्या.

ठळक मुद्देघेराव : महिनाभरापासून नळाचा पत्ता नाही

पिंपळगावात टँकर चालकाला बदडलेऑनलाईन लोकमतयवतमाळ : शहराच्या बहुतांश भागामध्ये महिनाभरापासून नळाला पाणीच आले नाही. यामुळे विविध भागातील महिला संतप्त होऊन रस्त्यावर उतरल्या. वडगाव रोड परिसरातील महिलांनी जीवन प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्यांना घेराव घातला. तर सिंघानियानगरात महिलांनी ड्रमसह रस्त्यावर ठिय्या दिला. पिंपळगाव येथे तर महिलांचा दुर्गावतार दिसून आला. पाणी वाटपावरून महिलांनी चक्क टँकर चालकालाच बदडले.यवतमाळ शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शहरातील निरोहीनगर, सारंग सोसायटी, प्रगती सोसायटी, वृंदावननगर, धनलक्ष्मीनगर परिसरात महिनाभरापासून नळाला पाणीच आले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या महिला शुक्रवारी दुपारी जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावर धडकल्या. तेथे कार्यकारी अभियंता अजय बेले जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीला गेल्याचे समजले. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे महिला निघाल्या असता जीवन प्राधिकरणाच्या प्रवेशद्वारावरच बेले दिसताच घेराव घातला. तब्बल तासभर हा घेराव सुरू होता.दरम्यान पिंपळगाव परिसरात पाणी वितरणात भेदभाव होत असल्याचा आरोप महिलांनी केला. या ठिकाणी पाणी वितरणासाठी आलेल्या टँकर चालकाला चांगलेच बदडले. यामुळे काही तणाव निर्माण झाला होता. तर सिंघानियानगरात महिला पाण्याचे रिकामे ड्रम घेऊन रस्त्यावर ठिय्या देऊन टँकरची प्रतीक्षा करीत होत्या.नगराध्यक्षांंनी केली गोखी प्रकल्पाच्या पाण्याची मागणीयवतमाळातील पाण्याची भीषण टंचाई लक्षात घेता नगराध्यक्ष कांचनताई चौधरी यांनी लोहारा एमआयडीसीला पाणीपुरवठा करणाºया गोखी प्रकल्पाचे पाणी यवतमाळकरांसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे. टंचाई उग्ररुप धारण केले असून तातडीची उपाययोजना म्हणून लोहारा एमआयडीसीतून दर्डानगर पाण्याच्या टाकीपर्यंत गोखीचे पाणी आणण्यात यावे, असा प्रस्ताव ठेवला आहे. पूर्वी या प्रकल्पातून दर्डानगर टाकीद्वारे पाणी आणले जात होते. पुन्हा ही पाईपलाईन कार्यान्वित करून एक महिन्यापासून पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना दिलासा मिळेल. तसेच वडगाव, लोहारा, वाघापूर, दर्डानगर, दारव्हा रोड या परिसरातही पाणी देता येईल. उर्वरित भागासाठी या टाकीवरून टँकरद्वारे पुरवठा करता येणे शक्य असल्याचे पत्रात नमूद केले आहे. याशिवाय पाईपलाईनच्या खर्चासाठी १४ व्या वित्त आयोगातून नियोजन करण्याची मागणी केली आहे. यामुळे निळोणा, चापडोह व गोखी अशा तीन प्रकल्पातून टंचाईवर मात करता येणे शक्य असल्याचे म्हटले आहे.