शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईने घेतला माळेगावात महिलेचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 23:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्क महागाव : तालुक्यातील ३० गावांमध्ये भीषण पाणीटंचाई आहे. कंत्राटदाराच्या दावणीला असलेले प्रशासन टंचाई नियोजनात सपशेल अपयशी ...

ठळक मुद्देप्रशासनाचा निष्काळजीपणा : आर्थिक मदतीसाठी ठिय्या आंदोलन, अधिकाऱ्यांवर फौजदारीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : तालुक्यातील ३० गावांमध्ये भीषण पाणीटंचाई आहे. कंत्राटदाराच्या दावणीला असलेले प्रशासन टंचाई नियोजनात सपशेल अपयशी ठरले आहे. त्यामुळे माळेगाव येथे विहीरीत पडून ४० वर्षीय महिलेचा मृत्यु झाला. हा अपघात नसून प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा बळी आहे. ग्रामस्थांनी महिलेच्या कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत द्यावी तसेच दुर्लक्ष करणाºया अधिकाºयावर फौजदारी गुन्हे दाखल करावे, या मागणीसाठी ठिय्या आंदोलन सुरु केले.विमल साहेबराव राठोड (४०) या महिलेचा सोमवारी ४५ फूट विहिरीत पडून मृत्यु झाला. गावात पाणी नसल्याने महिलांना पायपीट करावी लागते. या घटनेमुळे ग्रामस्थ प्रशासनावर भडकले आहे. त्यांनी महिलेचा मृतदेह माळेगाव येथील बसस्थानकासमोर ठेवला आहे. जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे विमल राठोड यांच्या मृतदेहाची वैद्यकीय तपासणी वृत्त लिहीपर्यंत झाली नव्हती.पाणी टंचाईवर मात करण्याचे कारण पुढे करून प्रशासनाने सहा विहीरींचे अधिग्रहण केले. अधिग्रहण केलेल्या विहिरी कोरड्या आहे. आर्थिक हितसंंबंधातून स्थानिक अधिकारी चुकीचे नियोजन करतात. याचाच फटका ग्रामस्थांना बसतो. माळेगाव येथेही हाच प्रकार घडला. ग्रामस्थांनी पंचायत समिती, गटविकास अधिकारी, तहसीलदार यांना वारंवार पाणी टंचाई उपाययोजनेसाठी निवेदने दिली. त्यानंतरही कागदोपत्री विहीर अधिग्रहण दाखवून पैसे लाटण्याचा प्रकार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.माळेगाव येथे चार विहीरींचे अधिग्रहण करण्यात आले. महिलेचा मृतदेह उत्तरीय तपासणीकरीता पुसद उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. अद्यापही अंत्यविधी झाला नाही.- एस.बी. मनवर, प्रभारी गटविकास अधिकारी.माळेगाव येथील विहीर अधिग्रहणाचा प्रस्ताव अद्यापही तहसील कार्यालयाकडे आलेला नाही. आतापर्यंत तालुक्यात २५ विहीरींचे प्रस्ताव आले आहे. आता नवीन प्रस्तावात माळेगावचा समावेश करण्यात आलेला नाही.- नीलेश मडके, तहसीलदार, महागावपंचायत समितीचे काम ढेपाळले आहे. अधिकारी कर्मचारी मुख्यालयी राहात नाही. सभापती प्रभारी गटविकास अधिकारी जनतेच्या मागणीकडे सपशेल दुर्लक्ष करतात. यामुळे राजीनामा देण्याच्या मानसिकतेत आहे.- संजय राठोड, उपसभापती, महागाव

टॅग्स :water shortageपाणीटंचाई