शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
5
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
6
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
7
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
8
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
9
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
10
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
11
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
12
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
13
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
14
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
15
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
16
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
17
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
18
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
19
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
20
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती

तळागाळातील कार्यकर्ता मातोश्रीसोबत; तालुकाप्रमुखही शिवसेनेशी एकनिष्ठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2022 05:00 IST

राजकारणातील शिंदे गटात संजय राठोड सामील झाले आहे. त्यामुळे शिंदेविरुद्ध उद्धव ठाकरे असा वाद शिवसेनेत रंगला आहे. या स्थितीत जिल्ह्यातील सर्वसामान्य शिवसैनिक मात्र आजही सत्तेबाहेर पडलेल्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठामपणे उभा आहे. शिवसेनेच्या भरोशावर पद, प्रतिष्ठा मिळालेल्यांना ईडीचा धाक होता. संपत्ती राखण्यासाठी त्यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला. शिवसैनिक कुणालाच घाबरणारा नसून पक्षप्रमुखासोबत राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात शिवसेनेने खासदार व एक आमदार दिला आहे. कॅबिनेट मंत्री असलेल्या संजय राठोड यांना भाजपने केलेल्या आरोपामुळे पायउतार व्हावे लागले. आता राजकारणातील शिंदे गटात संजय राठोड सामील झाले आहे. त्यामुळे शिंदेविरुद्ध उद्धव ठाकरे असा वाद शिवसेनेत रंगला आहे. या स्थितीत जिल्ह्यातील सर्वसामान्य शिवसैनिक मात्र आजही सत्तेबाहेर पडलेल्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठामपणे उभा आहे. शिवसेनेच्या भरोशावर पद, प्रतिष्ठा मिळालेल्यांना ईडीचा धाक होता. संपत्ती राखण्यासाठी त्यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला. शिवसैनिक कुणालाच घाबरणारा नसून पक्षप्रमुखासोबत राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

जिल्हाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत

जिल्ह्यातील शिवसैनिकांनी बंडखोर आमदारांचा रस्त्यावर उतरून निषेध केला. उमरखेड, यवतमाळ, वणी यासह बहुतांश तालुक्यात आंदोलने झाली. शिवसेनेचे तिन्ही जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड, माजी आमदार विश्वास नांदेकर, पराग पिंगळे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे जाहीर केले.

घाटंजी, दारव्हा शिंदे गटाकडेमहाविकास आघाडीत शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या विचारसरणीला हरताळ फासला गेला. याच बरोबर निधी वाटपात दुजाभाव केला जात असल्याच्या तक्रारी होत्या. याची पक्षश्रेष्ठीने दखल न घेतल्यामुळे सर्व प्रकार घडला आहे. आपण आमदार संजय राठोड यांच्यासोबत असल्याचे सांगत मनोज सिंगी यांनी शिंदे गटाला पाठिंबा दर्शविला. 

 कोण कोणाच्या पाठिशी? 

आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत खंबीरपणे उभे आहोत. आम्ही ना भाऊचे आणि ताईचे आम्ही शिवसेनेचे मावळे आहोत. त्यामुळे येणाऱ्या काळात मूळ शिवसेनेसोबतच राहणार. -  नीलेश मेत्रे, कळंब 

एकनाथ शिंदे व इतर आमदारांच्या बंडाशी आमचा कोणताही संबंध नाही. आम्ही सदैव ‘मातोश्री’सोबत आहोत. तालुक्यातील सर्वच पदाधिकारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेतच राहणार आहेत.  - दीपक काळे, पुसद 

शिवसेनेमधील काही मंत्री आणि आमदार सोडून गेले. त्यांना ईडीची भीती वाटत आहे, तर काहींना मंत्रिपदाची लालसा आहे. हे खरे कारण आहे. सध्या उद्धव साहेबांची बदनामी त्यांनी सुरू केले आहे.             - संजय रंगे, यवतमाळ 

  सर्व शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहेत. माजी मंत्री संजय राठोड यांनी बंडखोरी केली असली तरी सर्व पदाधिकारी व शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ आहेत.       - जयवंत बंडेवार, पांढरकवडा 

कार्यकर्ता मातोश्रीसोबत

सच्चे शिवसैनिक मनातून दुखावले आहेत. ते बाळासाहेबांच्या नावावर निवडून आले. सत्तेच्या लालसेपोटी पक्षाशी गद्दारी केली.              - रवी बोढेकर, वणी 

आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे सच्चे कार्यकर्ते आहोत.   दुसऱ्या गटाचा विचारही मनात येणे नाही. उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत.                  - वसंत जाधव, बाभूळगाव

 

टॅग्स :Shiv Senaशिवसेना