शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

वणी उपविभागात हेल्पर बनले वायरमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 22:26 IST

नियुक्ती करण्यामागील मुळ उद्देशाला हरताळ फासत वीज वितरण कंपनीच्या अधिकृत कर्मचाऱ्यांकडून कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या कामगारांची अक्षरश: मुस्कटदाबी केली जात आहे.

ठळक मुद्देजबाबदारी एक, काम दुसरेच : विद्युत कर्मचाऱ्यांच्या मनमानीने हेल्परची मुस्कटदाबी

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : नियुक्ती करण्यामागील मुळ उद्देशाला हरताळ फासत वीज वितरण कंपनीच्या अधिकृत कर्मचाऱ्यांकडून कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या कामगारांची अक्षरश: मुस्कटदाबी केली जात आहे. वीज वितरण कंपनीत कार्यरत लाईनमनला काम करताना केवळ मदत करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या या कामगारांना अक्षरश: वीज जोडण्याच्या कामात गुंतविले जात आहे.वणी तालुक्यात लालगुडा, चिखलगाव, वणी कृषी उत्पन्न बाजार समिती, मोहोर्ली, घोन्सा, कायर, मोहदा, शिंदोला याठिकाणी महावितरणचे ३३ के.व्ही.विद्युत उपकेंद्र आहेत. या विद्युत उपकेंद्राअंतर्गत काम करणाºया लाईनमनला मदत व्हावी म्हणून प्रत्येक उपकेंद्रात चार हेल्परची पदे कंत्राटी पद्धतीवर भरण्यात आली आहे. महात्मा फुले वायरमन कोआॅपरेटीव्ह सोसायटी यवतमाळच्याअंतर्गत हे कामगार वीज वितरणची कामे करित आहे. एखाद्या ठिकाणी वीज पुरवठ्यात बिघाड झाल्यास तेथे दुरूस्तीचे काम वायरमन करतो. या वायरमनला या कामात मदत व्हावी म्हणून हेल्परची नियुक्ती करण्यात आली आहे. या कामगारांना दरमहा आठ हजार रूपये मानधन दिले जाते. मात्र वणी तालुक्यात कार्यरत या कामगारांना थेट वीज जोडणीच्या कामाला जुंपले जात आहे. विशेष म्हणजे या कामाचा या कामगारांना फारसा अनुभव नाही. तरीही वरिष्ठांच्या सांगण्यावरून त्यांना ही जिकरीची कामे करावी लागत आहे. मुळात वीज जोडणीचे अथवा तांत्रिक दुरूस्तीचे काम करण्याची जबाबदारी ही वीज वितरणच्या कंपनीत कार्यरत लाईनमनची असते. परंतु हे लाईनमन स्वत: ते काम न करताना या कामगारांकडून सदर काम करून घेत आहेत. त्यामुळे यातून एखादा मोठा अपघात घडण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी राजूर येथील फिडरवर काम करणाऱ्या एका हेल्परचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला होता. मात्र त्यानंतरही हे हेल्पर वरिष्ठांच्या सांगण्यावरून धोका पत्करत वीज जोडणी अथवा तांत्रिक बिघाड दुरूस्तीची कामे करताना दिसत आहेत.लाईनमनने खांबावर चढून काम करणे अपेक्षित आहे. मात्र हेल्परलाच थेट खांबावर चढवून त्यांच्याकडून ही कामे करवून घेतली जात आहे. कसेबसे काम मिळाल्याने हे कामगार कोणतीही तक्रार न करता ही कामे करताना दिसत आहेत.जिल्हास्तरावरून होतेय कामगारांचे आर्थिक शोषणतालुक्यातील ३३ के.व्ही.उपकेंद्रात काही ठिकाणी चार, तर काही ठिकाणी दोन हेल्पर कार्यरत आहे. त्यांना दरमहा आठ हजार रूपये वेतन दिले जाते. मात्र त्या मानधनातील काही ‘वाटा’ जिल्हास्तरावर न चुकता दरमहा द्यावा लागतो. या वसुलीसाठी यवतमाळहून खास व्यक्ती येथे येत असल्याची माहिती आहे.

टॅग्स :electricityवीज