शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जंगलातील पाणवठे कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 22:38 IST

नेर वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या मालखेड व सोनखास येथील राखीव जंगलातील पाणवठे कोरडे ठक्क पडले आहे. त्यात पाणी नसल्याने वन्यप्राणी गावांकडे धाव घेत आहे. यात हिंस्त्र श्वापदाचाही समावेश असल्याने ग्रामस्थांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देनेर वनपरिक्षेत्र : सोनखास, मालखेड राखीव वनातील समस्या

पांडुरंग भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कसोनखास : नेर वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या मालखेड व सोनखास येथील राखीव जंगलातील पाणवठे कोरडे ठक्क पडले आहे. त्यात पाणी नसल्याने वन्यप्राणी गावांकडे धाव घेत आहे. यात हिंस्त्र श्वापदाचाही समावेश असल्याने ग्रामस्थांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.या राखीव जंगलामध्ये बिबटाचाही संचार असल्याची नोंद आहे. आता पाणी नसल्याने बिबट गावशिवारातील पाणवठ्यांवर येत आहे. हरीण, रोही, रानडुक्कर, लांडगे, कोल्हे हे प्राणीसुद्धा पाणवठ्यावर येत आहे. तृणभक्षी प्राण्यांची दबा धरून शिकार केली जात आहे. वन विभागाने लाखो रुपये खर्चून जंगलात पाणवठे तयार केले. या पाणवठ्यांमध्ये टँकरद्वारे पाणी टाकले जात होते. मात्र मागील काही दिवसांपासून वन विभागाचा हा उपक्रम ठप्प आहे. वन्यप्राण्यांना जंगलात पिण्यासाठी पाणी नाही. तहानेने व्याकूळ झालेले प्राणी गलितगात्र अवस्थेत गावशिवारात भरकटताना दिसत आहे. येथे कुत्र्यांकडून हरीण, रानडुक्कर, रोही याची शिकार होत आहे. सोनखास परिसरात गेल्या तीन महिन्यांपासून पाणीटंचाई असून या बाबीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.जंगलातील पाणवठ्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून तरतूद केली जाते. वार्षिक बजेट असल्यानंतरही स्थानिक वन अधिकारी व सहायक उपवनसंरक्षकाचे या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष आहे. याच तालुक्यातील लोनाडी बीटमध्ये बिबटाने हल्ला करून वगाराची शिकारही केली होती. सातत्याने बिबटाकडून गावशिवारात शिकारी होत आहे. त्याला जेरबंद करण्यासाठीही प्रयत्न केले जात नाही. हा बिबट ट्रॅप कॅमेऱ्यातही चित्रीत झाला आहे. आता तर तापमानात वाढ झाली असून पाणवठा शोधण्यासाठी वन्यप्राणी सैरभैर झाले आहे. रानडुक्कर, लांडगा, कोल्हा, बिबट यासारख्या हिंस्त्र श्वापदापासून शेत शिवारात काम करणाºया मजुरांमध्येही दहशत निर्माण झाली आहे तर काहींनी जंगलातील पाणीटंचाईचा उपयोग शिकारीसाठी केला आहे. गावालगतच्या पाणवठ्यावर शिकारी दबा धरून बसतात. सावज टप्प्यात येताच त्याची शिकार केल्या जाते. रोही, हरीण याच्या मोठ्या प्रमाणात शिकारी होत असून मांसाची विक्री सुरू आहे. एकीकडे वनसंवर्धनासाठी शासकीयस्तरावरून अनेक प्रयत्न सुरू आहेत.स्थानिक अधिकारी व यंत्रणा मात्र अर्थकारणाच व्यस्त असल्याने मुख्य समस्येकडे दुर्लक्ष होत आहे.वन विभागाचा टँकर जंगलात येत नाहीजंगलातील पाणवठ्यांमध्ये पाणी टाकण्यासाठी टँकरची तरतूद केली आहे. यावर आर्थिक खर्च झाल्याचे नियमित दाखविले जाते. प्रत्यक्षात जंगलातील पाणवठ्यांची स्थिती भयावह आहे. वन्यप्राणी याच वेळखाऊ धोरणामुळे धोक्यात आले आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात पाणवठ्यांमध्ये पाणी सोडण्याचे काम नियमित होत नाही. याचा फटका परिसरातील नागरिकांसह वन्यप्राण्यांना बसत आहे. वरिष्ठांनी राखीव जंगलातील पाणवठ्यांना प्रत्यक्ष भेटी देवून पाहणी करण्याची गरज आहे.