शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
2
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
3
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
4
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
5
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
6
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
7
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
8
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
9
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
10
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
11
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
12
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
13
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
14
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
15
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
16
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
17
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
18
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
19
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
20
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात

बच्चूभाऊंना जमले ते स्थानिकांना का नाही ?

By admin | Updated: April 19, 2015 02:09 IST

अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी अपंगांच्या प्रश्नांवर यवतमाळात येऊन केलेल्या आक्रमक आंदोलनाने येथील जनता चांगलीच प्रभावित झाली आहे.

यवतमाळ : अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी अपंगांच्या प्रश्नांवर यवतमाळात येऊन केलेल्या आक्रमक आंदोलनाने येथील जनता चांगलीच प्रभावित झाली आहे. १५० किलोमीटरवरील बच्चू कडूंना जे जमले ते एवढ्या वर्षात यवतमाळ जिल्ह्यातील एकाही आमदाराला का जमू नये, याची चर्चा आता जोर धरत आहे.अपंग व्यक्ती हा समाजातील दुर्लक्षित घटक आहे. त्याला समाजातून मिळणाऱ्या हीन वागणुकीचा सामना करावा लागतो. शारीरिक व्यंगत्वावर बोट ठेवून त्यांचा अवमान केला जातो. समाजातून ही वागणूक असताना सरकारमधील घटक आणि शासकीय यंत्रणाही त्यांच्याशी सौजन्याने वागत नाही. त्यांचे कुणी वाली नाही, असे समजून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आरक्षित ठेवला जाणारा निधी इतर बाबींवर वळविला जातो. गेल्या दहा वर्षांपासून हा प्रकार राजरोसपणे शासकीय अभिलेख्यातून पाहायला मिळतो. मात्र त्याविरोधात कुणीही आवाज उठविला नाही. अपंगांच्या बाबतीत आघाडी सरकारमधील आमदारांचाच कित्ता युती सरकारमधील आमदार गिरवित आहेत. मात्र अमरावती जिल्ह्यातील अचलपूरचे अपक्ष आमदार तथा ‘प्रहार’ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू मात्र १५० किलोमीटरवरील या अपंगांच्या मदतीला यवतमाळात धावून आले. शुक्रवारी कडू यांच्या नेतृत्त्वात अपंगांनी थेट जिल्हा परिषदेवर धडक दिली. सीईओंच्या कक्षाचा ताबा घेवून त्यांची खुर्ची टेबलवर ठेवत त्याला हार घातला गेला. नंतर उपस्थित झालेल्या सीईओंची झाडाझडती घेतली गेली. शेजारील जिल्ह्यातून येवून एखादा आमदार स्थानिक अपंगांच्या समस्यांना एवढ्या पोटतिडकीने आणि आक्रमकपणे प्रशासनापुढे मांडू शकतो, याचेच खरे अप्रुप जिल्ह्यातील जनतेला वाटते आहे. कारण त्यांनी समाजातील उपेक्षित घटकांच्या प्रश्नावर जिल्ह्यातील कोणत्याही आमदाराला एवढे आक्रमक होताना कधी पाहिले नाही. जिल्ह्यातील आमदार स्थानिकांच्याच समस्यांना हात घालत नाहीत तर खरंच दुसऱ्या जिल्ह्यातील समस्याग्रस्तांच्या मदतीला धावून जातील का, असा उपरोधिक सवाल जनतेतून विचारला जात आहे. यापूर्वी १५ वर्षे राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता होती. या पक्षातील सर्वच दिग्गज आणि व्हीआयपी असल्याने त्यांच्याकडून जनसामान्यांच्या प्रश्नांवर अशा आक्रमक आंदोलनाची जनतेनेही कधी अपेक्षा ठेवली नाही. एकतर ते कधी रस्त्यावरच उतरले नाही आणि एखादवेळी उतरले तरी ते प्रशासनाला निवेदन देण्यापुरते. विरोधी पक्षात असताना शिवसेना नेत्यांनी सुरुवातीला अशी चार-दोन आक्रमक आंदोलने केलीही, मात्र जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीसोबत सत्तेत बसल्यापासून त्यांचीही अशी आंदोलने जणू बंद झाली होती. आता तर भाजप-सेना सत्तेत असल्याने त्यांच्याकडून अशा आक्रमक आंदोलनाची अपेक्षा ठेवणे गैरच, तर दुसरीकडे विरोधी बाकावर असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना मुळात आंदोलनाची सवयच नाही, आक्रमक आंदोलन तर दूरच. जिल्ह्यातील सत्ताधारी व विरोधी पक्षाकडून जनतेच्या प्रश्नांवर आक्रमक आंदोलनांबाबत नागरिकांचा अपेक्षाभंग झाला असला तरी बच्चू कडू यांच्या आंदोलनाने मात्र आशा पल्लवीत झाल्या आहेत. आंदोलनासाठी जिल्ह्यातीलच आमदार असणे गरजेचे नाही, शेजारील जिल्ह्यातील (जनतेच्या समस्यांची जाणीव असलेले) आमदारही आपल्या जिल्ह्यात येवून आक्रमक आंदोलनाचे नेतृत्त्व करू शकतात याची जाणीव स्थानिक जनतेला झाली आहे. त्यामुळेच जिल्हा परिषदेतील बच्चू कडूंच्या आंदोलनाने यवतमाळकर जनता ‘इम्प्रेस’ झाली आहे. त्याचवेळी स्थानिक आमदारांना एवढ्या वर्षात असे एकही आंदोलन का करता आले नाही, असा सवाल मात्र प्रत्येकच जण एकमेकांना विचारताना दिसतो आहे. (जिल्हा प्रतिनिधी)