शहरं
Join us  
Trending Stories
1
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
2
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
3
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
4
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त
5
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, सीआरपीएफच्या जवानानं पत्नीचं मुंडकं छाटलं! वृत्त वाहिनीच्या ऑफिसमध्ये गेला अन्...
6
हातखंबा येथे पुन्हा अपघात, गॅसवाहू टँकर वडापावच्या टपरीवर आदळला; ग्रामस्थांनी महामार्ग अडवला
7
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
8
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
9
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले
10
समृद्धीने सुसाट निघाल तर पकडले जाल, तुमच्यावर लक्ष ठेवणार एक हजार ‘डोळे’
11
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
12
‘महादेवी’ हत्तीण प्रकरणात शासनाचा आदेश नाही, उद्या मुंबईत बैठक : मुख्यमंत्री
13
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
14
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
15
पुत्रदा एकादशी-बुध प्रदोष: ८ राशींना सर्वोत्तम काळ, शुभ-लाभ; हाती पैसा राहील, कल्याण होईल!
16
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
17
वसईची भयंकर घटना, मुंबईला धोक्याची घंटा!
18
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
19
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
20
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू

सासूचा नोकरीतील वारस मुलगा की सून? मॅटसमोर प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 12:59 IST

सासूच्या निधनानंतर अनुकंपा नोकरीचा वारसदार मुलगा की सून ? या प्रश्नाच्या अनुषंगाने मुंबई ‘मॅट’मध्ये कुटुंबाच्या व्याख्येवर अनेक तास खल चालला. अखेर ‘मॅट’ने निर्णय घेण्याच्या सूचना शासनाला दिल्या.

ठळक मुद्देकुटुंबाच्या व्याख्येवर ‘मॅट’मध्ये खलचेंडू शासनाच्या कोर्टात, सुनेला तूर्त दिलासा

राजेश निस्ताने ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सासूच्या निधनानंतर अनुकंपा नोकरीचा वारसदार मुलगा की सून ? या प्रश्नाच्या अनुषंगाने मुंबई ‘मॅट’मध्ये कुटुंबाच्या व्याख्येवर अनेक तास खल चालला. अखेर ‘मॅट’ने निर्णय घेण्याच्या सूचना शासनाला दिल्या. मात्र त्यापूर्वी सुनेची काढून घेतलेली नोकरी तिला पुन्हा बहाल करण्याचे व त्यानंतर काय तो निर्णय घेण्याचे आदेश ‘मॅट’ने दिले.कविता संजय घोंगडे असे या सूनेचे नाव आहे. सोलापूरच्या उपवनसंरक्षक कार्यालयात कनिष्ठ लिपिक म्हणून त्यांची नियुक्ती होती. मात्र सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशाचा हवाला देत वन विभागाने कविताला अचानक नोकरीतून काढून टाकले. अनुकंपा नोकरीसाठी वारसदार म्हणून तुम्ही पात्र नसल्याचे त्यांना सांगण्यात आले.या निर्णयाविरोधात कविता घोंगडे यांनी अ‍ॅड. भूषण बांदिवडेकर यांच्यामार्फत मुंबई ‘मॅट’मध्ये (महाराष्ट प्रशासकीय न्यायाधीकरण) धाव घेतली. तेथे वारसदार नेमका मुलगा की सून? आणि कुटुंबाची व्याख्या यावर बरीच चर्चा झाली. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर ‘मॅट’चे उपाध्यक्ष जे.डी. कुलकर्णी यांनी शासनाचा १९९६ चा जीआर उचलून धरला. त्यात सुनेचा अधिकार सर्वात शेवटी येत असल्याचे नमूद आहे. अनुकंपा नोकरीसाठी सुनेला पात्र ठरवायचे की अपात्र याचा निर्णय शासनाने घ्यावा. परंतु कोणत्याही नोटीसशिवाय कविताची काढून घेतलेली नोकरी तिला परत द्यावी, या काळातील आर्थिक लाभही देण्यात यावे, असे आदेश २ फेब्रुवारी रोजी न्या. जे.डी. कुलकर्णी यांनी दिले. या खटल्यात शासनाच्यावतीने सादरकर्ता अधिकारी म्हणून श्रीमती ए.बी. कोलोलगी यांनी काम पाहिले.

नोटीस न देता नोकरीतून काढले कसे?या मुद्यावर अ‍ॅड. भूषण बांदिवडेकर यांनी ‘मॅट’मध्ये युक्तिवाद करताना मृत तनूबाईचा दुसरा मुलगा आधीच नोकरीत आहे तर विवाहित मुलींनी आम्हाला नोकरीत इन्टरेस्ट नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे सूनच वारसदार ठरत असल्याचे ‘मॅट’ला सांगितले. त्यावर कुटुंबाच्या व्याख्येचा अर्थ लावणे वादग्रस्त मुद्दा आहे. म्हणून हा निर्णय शासनालाच घेऊ द्या, असे स्पष्ट करीत ‘मॅट’ने कोणतीही नोटीस न देता नोकरीतून काढले कसे, या मुद्यावर भर दिला. कविताला आधी पूर्वपदावर सेवेत घ्या व नंतर तिच्या अनुकंपा नोकरीतील पात्रतेचा निर्णय घ्या, असा आदेश दिला.

सासू, पतीच्या निधनानंतर सून नोकरीतप्रकरण असे की, तनूबाई (कविताच्या सासु) घोंगडे या वन खात्यात शिपाई पदावर कार्यरत होत्या. त्यांच्या निधनानंतर अनुकंपा उमेदवारांच्या प्रतीक्षा यादीत त्यांचा मुलगा संजय घोंगडे यांचे नाव होते. संजय यांना नोकरी देण्याबाबत कुटुंबातील अन्य वारसदारांनी सहमती दर्शविली होती. दरम्यान, प्रतीक्षा यादीत असतानाच विवाहित संजयचेही निधन झाले. त्यामुळे अनुकंपा तत्वावर त्याच्या पत्नीला नियुक्ती देण्यात आली. या काळात सामान्य प्रशासन विभागाने आक्षेप घेतल्याने कविताला नोकरीवरून काढून टाकण्यात आले. सासूच्या अनुकंपा नोकरीवर आधी दुसऱ्या मुलाचा-मुलीचा व नंतर सुनेचा अधिकार असल्याचे सामान्य प्रशासन विभागाने म्हटले आहे.

टॅग्स :Governmentसरकार