लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : नागरिकता संशोधन कायद्याच्या समर्थनार्थ सोमवारी सकाळी ११ वाजता येथील राष्ट्र सुरक्षा मंचतर्फे हुंकार रॅली काढण्यात आली. या रॅलीतील २५० फुटाचा राष्ट्रध्वज सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरला.सदर रॅलील नगरपरिषद स्टेडीयमपासून सुरूवात झाली. सर्व शहरभर फिरून मित्र क्रीडा मंडळ मैदानात रॅलीची सांगता केली. आयोजकांच्या दाव्यानुसार सुमारे १० हजार महिला-पुरूष, वृद्ध, बालक यात सहभागी झाले होते. राष्ट्रपे्रम व्यक्त करण्याकरिता पांढरकवडाच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात नागरिक एकत्रित आल्याच्या प्रतिक्रीया सर्वत्र उमटत होत्या. ‘दोन तास देशासाठी’ असे आवाहन आयोजकांनी केले होते. त्याला राष्ट्रभक्तांनी अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद दिल्याचे आयोजकांनी सांगितले. येथील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फुर्तीने कडकडीत बंद पाळून रॅलीला समर्थन दिले. या रॅलीत सहभागी होण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने आले होते. यावेळी राष्ट्रप्रेम, देशप्रेम, राष्ट्रहिताचे नारे देण्यात आले. त्यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी ठाणेदार रामकृष्ण महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
सीएए समर्थनार्थ पांढरकवडात हुंकार रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 05:00 IST
सदर रॅलील नगरपरिषद स्टेडीयमपासून सुरूवात झाली. सर्व शहरभर फिरून मित्र क्रीडा मंडळ मैदानात रॅलीची सांगता केली. आयोजकांच्या दाव्यानुसार सुमारे १० हजार महिला-पुरूष, वृद्ध, बालक यात सहभागी झाले होते. राष्ट्रपे्रम व्यक्त करण्याकरिता पांढरकवडाच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात नागरिक एकत्रित आल्याच्या प्रतिक्रीया सर्वत्र उमटत होत्या.
सीएए समर्थनार्थ पांढरकवडात हुंकार रॅली
ठळक मुद्देव्यापाऱ्यांचा स्वयंस्फूर्त बंद : २५० फुटांचा राष्ट्रध्वज ठरला सर्वांचे आकर्षण