शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

वेणी धरणाचे दहा कोटी अडले कुठे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 05:00 IST

लोअरपूस उभारणीच्या काळापासून टेलपर्यंत पाणी नेण्याचा प्रश्न रखडला आहे. दहा कोटींच्या निदीमुळे ही समस्या सुटण्याची अपेक्षा होती. मात्र मंजूर निधी नेमका कुठे अडला, हे कळायला मार्ग नाही. हा निधी मिळाल्यास तालुक्यातील सिंचन क्षेत्रात मोठी वाढ होऊ शकते. तालुक्यात एकूण ६८ हजार हेक्टर लागवड क्षेत्र आहे. त्यापैकी रब्बी हंगामात केवळ चार ते साडे चार हजार हेक्टरच जमीन सिंचनाखाली आहे.

ठळक मुद्देधडपड व्यर्थ : टेलपर्यंत सिंचन क्षेत्र वाढविण्यात अडसर

ज्ञानेश्वर ठाकरे ।लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : तालुक्यातील वेणी येथील लोअरपूस-वेणी धरणाचे पाणी टेलपर्यंत नेण्याची पाटबंधारे विभागाची धडपड अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्याकरिता गेल्यावर्षी नऊ कोटी ७८ लाख रुपये मंजूर झाले. मात्र हा निधी अद्यापही पाटबंधारे विभागाला मिळाला नाही. त्यामुळे पाटबंधारे विभागाची शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पाणी नेण्याची धडपड व्यर्थ होताना दिसत आहे.लोअरपूस उभारणीच्या काळापासून टेलपर्यंत पाणी नेण्याचा प्रश्न रखडला आहे. दहा कोटींच्या निदीमुळे ही समस्या सुटण्याची अपेक्षा होती. मात्र मंजूर निधी नेमका कुठे अडला, हे कळायला मार्ग नाही. हा निधी मिळाल्यास तालुक्यातील सिंचन क्षेत्रात मोठी वाढ होऊ शकते. तालुक्यात एकूण ६८ हजार हेक्टर लागवड क्षेत्र आहे. त्यापैकी रब्बी हंगामात केवळ चार ते साडे चार हजार हेक्टरच जमीन सिंचनाखाली आहे. लोअरपूसचे पाणी टेलपर्यंत पोहोचल्यास आणखी दोन हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येऊ शकते.लोअरपूस-वेणी धरणाची सिंचन क्षमता सहा हजार ६०० हेक्टर असल्याचे सांगितले जाते. मात्र टेलपर्यंत पाणी पोहोचत नसल्यामुळे दरवर्षी केवळ साडेचार हजार हेक्टरवरच सिंचन होते. यामुळे हा मंजूर निधी शेतकऱ्यांच्या हिताचा ठरला असता. टेलपर्यंत पाणी नेण्यासाठी तालुका, जिल्हा स्तरावर शेतकºयांनी विविध आंदोलने केली होती. मात्र ही समसया अद्याप अधांतरीच आहे. तत्कालीन आमदार राजेंद्र नजरधने यांनी विदर्भ पाटबंधारे महामंडळाचे तत्कालीन उपाध्यक्ष सुनील देशमुख यांच्यासह बैठक घेऊन नऊ कोटी ७८ लाखांच्या निधीचा प्रस्ताव सादर केला होता. त्या प्रस्तावाला मंजुरीसुद्धा मिळाल्याचे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले होते. मात्र वर्ष लोटूनही हा निधी मिळाला नाही.कॅनाल, मायनरचे काम रखडलेमंजूर निधीतून कॅनाल आणि मायनरचे काम करण्याची योजना आखण्यात आली होती. यावर्षीच्या पावसाळ्यानंतर या कामाला गती येण्याची शक्यता होती. मात्र मंजूर निधी मिळाला नसल्याने या संदर्भात सातत्याने पत्रव्यवहार करीत असल्याचे वेणी धरणाचे शाखा अभियंता योगेश अंबीलवादे यांनी सांगितले. मात्र अद्याप याबाबत सकारात्मक निर्णय झाला नाही. सध्या लोअरपूसचा पाणीसाठा ८९ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे पुढील काळात पाणीटंचाई भासणार नसून रब्बी हंगामात चांगल्या प्रकारे सिंचन होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :DamधरणIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प