शहरं
Join us  
Trending Stories
1
One Big Beautiful Bill Passed : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय, अमेरिकेच्या संसदेत 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; नेमकं काय आहे यात?
2
चिनी शस्त्रे 'फुसकी' निघाली, पाकिस्तनाने अमेरिकेच्या दारात 'झोळी' पसरली; US च्या 'या' घात अस्त्रांवर पाकचा डोळा!
3
टेस्टमध्ये फुटबॉलचं ट्विस्ट! हॅरी ब्रूकनं खांद्यानं उडवला स्टंपवरचा चेंडू; आधी पंतनं केली टाइमपास करतोय अशी तक्रार, मग...
4
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
5
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप
6
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
7
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
8
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
9
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
10
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
11
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
12
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
13
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
14
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
15
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
16
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
17
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
18
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
19
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
20
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण

बसस्थानकावर गाड्या ठेवायच्या कुठे ?

By admin | Updated: February 15, 2016 02:34 IST

सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बसस्थानकावर मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.

सुरक्षा वाढविली पण सामान्यांची गैरसोय : बसस्थानकात खासगी वाहनांना ‘नो एन्ट्री’, रस्त्यावर धरपकडयवतमाळ : सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बसस्थानकावर मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. त्यामुळे आता प्रवाशांना सोडण्यासाठी आलेल्या नागरिकांनी आपली वाहने आत नेणे अशक्य झाले आहे. परंतु, बसस्थानक परिसरात वाहनतळासाठी जागाच नसल्याने गाड्या ठेवायच्या तरी कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.यवतमाळ बसस्थानक हे कायम वर्दळीचे ठिकाण आहे. रोज हजारो प्रवाशांची येथे ये-जा असते. परंतु, प्रवाशांना सोडण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी आपली वाहने कुठे उभी करायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. नागपूर, मुंबई, औरंगाबाद, पुणे अशा शहरांसाठी यवतमाळातून राज्य परिवहन महामंडळाची थेट बससेवा आहे. त्यामुळे प्रवाशांची नेहमीच गर्दी असते. बहुतांश प्रवासी आॅटोरिक्षाऐवजी नातेवाईकांच्या दुचाकीवर बसूनच बसस्थानकापर्यंत येतात. नातेवाईकांना ‘सोडण्यासाठी’ आलेल्या या नागरिकांना बसस्थानकात कुठेही गाड्या उभ्या कराव्या लागतात. वास्तविक, बसस्थानकात खासगी वाहने नेण्यावर बंधन आहे. पण या ठिकाणी वाहनतळच उपलब्ध नसल्याने प्रवाशांचे नातेवाईक आपली दुचाकी वाहने परिसरात वाटेल तिथे उभी ठेवतात.आता तर ही सोयदेखील बसस्थानक प्रशासनाने बाद केली आहे. सुरक्षेच्या कारणावरून सुरक्षारक्षकांची संख्या बसस्थानकावर वाढविण्यात आली आहे. त्यामुळे बसशिवाय कोणतेही वाहन आत नेणे कठीण झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे, दुचाकी बसस्थानकाबाहेर कुठे उभे ठेवावे, हाही प्रश्न आहे. बसस्थानकाच्या बाहेरील परिसरही प्रचंड गर्दीचा आहे. तेथे निट वाहतुकीसाठीही पुरेसा रस्ता उरलेला नाही. अशा ठिकाणी प्रवाशांच्या नातेवाईकांनी गाडी ‘पार्क’ केल्यास हमखास चोरीची शक्यता आहे.बसस्थानकावर गेल्या काही दिवसांत दुचाकी चोरीच्याही घटना वाढल्या आहेत. दोन दिवसांपूर्वीच दुचाकीची चोरी या ठिकाणाहून झाली. रविवारी एकाच दिवशी दोन सायकली चोरीस गेल्या. परंतु, या चोरीची तक्रार पोलिसांपर्यंत पोहोचलेली नसल्याने या घटनेचा फारसा गवगवा झालेला नाही. परंतु, चोरीची भीती असलेल्या बसस्थानकावर गाडी नेमकी कुठे उभी करावी, हा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. सुरक्षेसाठी बसस्थानकात खासगी वाहने नेण्यावर बंदी टाकणे योग्यच आहे. मात्र, त्यासाठी वाहनतळाची जागा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी पुढे आली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)