शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

आमचा संसारच उघड्यावर शौचालय बांधायचे कुठे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 00:12 IST

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छतेतून समृद्धीचा नारा देत गावोगावी शौचालय बांधण्याचा उपक्रम सुरू आहे.

ठळक मुद्देभटक्यांची समस्या : स्वच्छ भारत मिशन अभियानाला तडा

अखिलेश अग्रवाल।लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छतेतून समृद्धीचा नारा देत गावोगावी शौचालय बांधण्याचा उपक्रम सुरू आहे. हागणदारीमुक्त गाव करण्यासाठी शासन शौचालय बांधण्यास अनुदानही देते. मात्र, गावकुसाबाहेर पाल ठोकून उघड्यावर संसार करणाºया भटक्यांपुढे मोठा प्रश्न पडला आहे. घरासाठी जागा नाही तेथे शौचालय बांधायचे कुठे, असा प्रश्न आहे. पुसद शहरासह इतर ठिकाणीही भटक्यांची अशी परिस्थिती प्रशासनाच्या मोहीमेला अडसर ठरत आहे.पोटाची खळगी भरण्यासाठी परराज्यातून आलेले अनेक कुटुंब मिळेल त्या ठिकाणी पाल उभे करतात. तेथेच त्यांचा संसार सुरू होते. दिवसभर फिरू पत्र्याचे डब्बे, खुर्च्या, खाटा विकून संसाराचा गाडा ओढळतात. दिवसाकाठी २०० रुपयेही त्यांच्या हाती उरत नाही. अशा परिस्थिती ही मंडळी पक्के घर बांधण्याचे स्वप्नही पाहू शकत नाही. जेथे दोन वेळच्या जेवणाची भ्रांत तेथे शौचालय बांधायचे कुठे असा प्रश्न निर्माण होतो.पुसद शहारासह तालुक्यात ठिकठिकाणी पारधी बेडे आहेत. या बेड्यावर राहणारी मंडळी उघड्यावर राहतात. त्यांनाही आता शौचालय बांधण्याची सक्ती होऊ लागली. परंतु उघड्या आकाशाखाली राहणाºया मंडळींना बंदिस्त शौचालय मानवेल काय, असा प्रश्न आहे.एकीकडे अनुदान घेऊन शौचालय बांधणारे अनेक कुटुंबही गावात शौचालयाचा वापर करीत नाही. आजही राजरोजपणे लोटा घेऊन मोकळ््या जागेचा शोध घेतातत. अशा व्यक्तींवर कारवाईचा बडगा उगारायचा सोडून भटक्यांवरच कारवाई होत आहे. ज्यांना घरच नाही, त्यांना उघड्यावर जाण्याशिवाय पर्याय नसल्याचे दिसून येते.कारवाईपूर्वी समज द्यापुसद शहरासह तालुक्यात उघड्यावर शौचास बसणाºयांवर कारवाई केली जात आहे. गुड मॉर्निंग पथक पहाटेच धडक देत आहे. या कारवाईच्या कचाट्यात अनेक भटके सापडतात. परंतु अशा मंडळींची चौकशी करूनच कारवाई करावी, अशी मागणी आहे. परंतु पाठ थोपटून घेण्यासाठी हे पथक उघड्यावर जाणाºयांची वरात काढून पोलीस ठाण्यात आणतात, त्यांच्यावर गुन्हेही दाखल करतात. परंतु त्यांच्या परिस्थितीचा विचार करीत नाही.