शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

शासकीय हरभरा खरेदीचा मुहूर्त केव्हा निघणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 05:00 IST

जिल्ह्यात अजूनही हजारो शेतकऱ्यांचा हरभरा विकणे बाकी आहे. खरिपाच्या तयारीसाठी बी-बियाणे घेण्याकरिता धडपडत आहे. मात्र शेतमाल घरीच पडून असल्याने शेतकऱ्यांपुढे अनेक अडचणी उभ्या ठाकल्या आहे. हरभऱ्याची खरेदी सुरू न झाल्याने तो विकायचे कोठे, खुल्या बाजारात विकल्यास व्यापारी अतिशय कमी दरात तो खरेदी करत आहे. हरभऱ्याचे यावर्षी समाधानकारक उत्पन्न झाले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचा सवाल : प्रशासनाला हवे गोदाम, पावसाळा तोंडावर तरी हरभरा घरातच

लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : शेतकऱ्याच्या कापूस व तूर खरेदीच्या अडचणीनंतर आता हरभरा खरेदीचा विषय गंभीर झाला आहे. पावसाळा तोंडावर असतानाही रबी हंगामात निघालेले हरभऱ्याचे पीक अजूनही घरात पडून आहे. शासन हरभरा खरेदी कधी सुरू करते, त्यांना मुहूर्त कधी मिळणार असा प्रश्न जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पडला आहे.जिल्ह्यात अजूनही हजारो शेतकऱ्यांचा हरभरा विकणे बाकी आहे. खरिपाच्या तयारीसाठी बी-बियाणे घेण्याकरिता धडपडत आहे. मात्र शेतमाल घरीच पडून असल्याने शेतकऱ्यांपुढे अनेक अडचणी उभ्या ठाकल्या आहे. हरभऱ्याची खरेदी सुरू न झाल्याने तो विकायचे कोठे, खुल्या बाजारात विकल्यास व्यापारी अतिशय कमी दरात तो खरेदी करत आहे. हरभऱ्याचे यावर्षी समाधानकारक उत्पन्न झाले. मात्र शासनाने हमी भावात हरभरा खरेदी केंद्र सुरू न केल्याने व्यापाऱ्यांना कमी भावात हरभरा विकावा लागत आहे. चार हजार ७०० रुपये हरभऱ्याचा आधारभूत भाव आहे. मात्र पैशांची गरज लक्षात घेता शेतकऱ्यांना तो तीन ते साडेतीन हजारातच खासगी व्यापाऱ्यांना विकावा लागत आहे. शासन व व्यापारी शेतकऱ्यांच्या पाटावर व पाठीवर असे दोनही बाजूने मारण्याचे काम सुरू आहे. गोडावून उपलब्ध नसल्याच्या कारणावरून हरभरा खरेदी होवू शकले नाही, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यासाठी धामणगाव येथील गोडावून आरक्षित केले आहे. आता त्या गोडावूनमध्ये रासायनिक खताचा साठा असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या गोडावूनचा अजूनही जिल्ह्याला ताबा मिळालेला नाही. तो कधी मिळेल याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.गोदामांअभावी थांबली हरभरा खरेदी : व्हीसीएमएसगोडावून उपलब्ध नसल्यामुळे हरभरा खरेदी थांबली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात येत आहे. वरिष्ठ पातळीवरच माहिती देण्यात आली आहे. लवकर हरभरा खरेदी सुरू होईल, अशी माहिती ‘व्हीसीएमएस’चे जिल्हा व्यवस्थापक अमोल राजगुरे यांनी दिली.शेतकरी संघर्ष समिती आक्रमकशेतकरी अनेक अडचणीत अडकला आहे. यात हरभरा खरेदीस दिरंगाई करून तो पुन्हा पिचला जाणार आहे. त्यामुळे हरभरा खरेदी तत्काळ व्हावी, अशी मागणी शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने कळंब बाजार समिती सभापती प्रवीण देशमुख, अशोक गोबरे, वसंत घुईखेडकर, नानाभाऊ गाडबैले, सुरेश चिंचोळकर, बालू पाटील दरणे, दिनेश गोगरकर, आनंदराव जगताप, घनश्याम दरणे, जयंत घोगे, अनिल गायकवाड आदींनी केली. लवकर हरभरा खरेदी करून त्याचा मोबदला शेतकºयांना द्यावा, खरिपाच्या बी-बियाणे खरेदीसाठी तो पैसा कामात येईल, असे निवेदनात नमूद आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी