शहरं
Join us  
Trending Stories
1
'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
2
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
3
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
4
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
5
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय
6
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावच जाहीर केली!
7
..तर वयाच्या पन्नाशीआधीच २ कोटी रुपये जमा होतील; कोट्यधीश करणारा १२-१२-२५ चा फॉर्म्युला
8
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
9
सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली
10
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...
11
कतारची रॉयल फॅमिली देणार डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात महागडं गिफ्ट; ४० कोटी डॉलरचं विमान
12
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
13
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
14
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
15
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
16
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
17
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
18
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
19
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
20
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?

धावत्या बसचे स्टेअरिंग तुटते तेव्हा...

By admin | Updated: March 9, 2016 00:04 IST

ब्रेकडाऊन झाल्याने प्रवाशांना त्रास. स्टेअरिंग फेल होऊन बस झाडावर आदळली. ब्रेक निकामी झाल्याने अपघात थोडक्यात टळला, या घटना ‘एसटी’साठी नवीन राहिलेल्या नाही.

चालकाचे प्रसंगावधान : कोटंबा गावाजवळील घटनायवतमाळ : ब्रेकडाऊन झाल्याने प्रवाशांना त्रास. स्टेअरिंग फेल होऊन बस झाडावर आदळली. ब्रेक निकामी झाल्याने अपघात थोडक्यात टळला, या घटना ‘एसटी’साठी नवीन राहिलेल्या नाही. पण त्याहीपेक्षा गंभीर घटना सोमवारी कोटंबा येथे घडली. धावत्या बसचे स्टेअरिंग तुटून चक्क चालकाच्या हाती आले. प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला अन् प्रवाशांनी सुटकेचा सुस्कारा सोडला.सोमवारी सकाळी एमएच ४०-८७६१ ही बस यवतमाळ-कोटंबा-बाभूळगावसाठी निघाली. दहा ते बारा प्रवासी या बसमध्ये होते. ही बस कोटंबा गावापर्यंत सुस्थितीत पोहोचली. तेथून पुढील प्रवासासाठी निघाली. बसने गती पकडण्यापूर्वीच स्टेअरिंग तुटले. चालकाची घाबरगुंडी उडाली. पण समयसूचकता दाखविल्याने बस थांबली. या बसचा वेग अधिक असता तर मोठा अनर्थ घडला असता. यावेळी बसमध्ये दहा प्रवासी होते. अचानक बस थांबल्याने काय झाले, हे प्रवाशांना कळलेच नाही. पण झाला प्रकार माहीत होताच त्यांच्या हृदयाचे ठोके वाढले. पर्यायी व्यवस्थेने ते पुढील प्रवासाला निघाले.सदर बस मार्गावर नेण्यायोग्य नसल्याने कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांनी थांबवून ठेवली होती. यानंतरही वाहन परीक्षकांनी सदर बस चालकांना फेरीसाठी सोपविली. यावरून आगारात समन्वयाचा प्रचंड अभाव असल्याचे स्पष्ट होते. आगार व्यवस्थापकाचेही यावर नियंत्रण नाही, ही बाबही या निमित्ताने सिध्द झाली आहे. यवतमाळ आगारातील कारभाराचा फटका महामंडळाला बसत आहे. विविध कारणांमुळे आर्थिक नुकसान होत आहे. आता तर प्रवाशांचा जीवावर उठला आहे. विभाग नियंत्रकांनी ही बाब सहज घेऊ नये, अशी अपेक्षा कामगार आणि प्रवाशांना आहे. (वार्ताहर)