शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

१६ हजार पोलीस कर्मचाऱ्यांना फौजदारकी केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 12:28 IST

नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या १६ हजारांवर पोलीस कर्मचाऱ्यांनी आता महासंचालकांकडे नवा पर्यायवजा प्रस्ताव सादर केला आहे. त्यात ‘एनपीसी’ अर्थात नायक पोलीस कॉन्स्टेबल हे पद रद्द करून त्या पदाला थेट फौजदारकीचा दर्जा द्यावा, अशी मागणी केली गेली आहे.

ठळक मुद्देमहासंचालकांना सवाल‘एनपीसी’चे पद रद्द करून ‘पीएसआय’ पदावर नियुक्तीचा प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : खात्यांतर्गत फौजदार पदासाठी परीक्षा उत्तीर्ण होऊनही गेल्या अनेक वर्षांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या १६ हजारांवर पोलीस कर्मचाऱ्यांनी आता महासंचालकांकडे नवा पर्यायवजा प्रस्ताव सादर केला आहे. त्यात ‘एनपीसी’ अर्थात नायक पोलीस कॉन्स्टेबल हे पद रद्द करून त्या पदाला थेट फौजदारकीचा दर्जा द्यावा, अशी मागणी केली गेली आहे.सन २०११ ते २०१३ या सलग तीन वर्ष फौजदारपदी बढतीसाठी खात्यांतर्गत परीक्षा घोषित करण्यात आली होती. परंतु प्रत्यक्षात ती घेतली गेली नाही. २०१३ अखेर ही परीक्षा घेण्यात आली. दहा वर्षे सेवा झालेले सर्व पोलीस शिपाई ते एएसआय या परीक्षेस पात्र होते. २५ हजार ६६६ पोलिसांनी ही परीक्षा दिली. त्यापैकी १९ हजार ३८४ उमेदवार उत्तीर्ण झाले. त्यातील दोन हजार ४७५ उमेदवारांना आतापर्यंत फौजदारपदी नियुक्ती दिली गेली. त्या यादीतील १६ हजार ९०९ पोलीस कर्मचारी अद्यापही फौजदार पदावरील नियुक्तीपासून वंचित आहे. खात्यांतर्गत परीक्षेसाठी असलेला २५ टक्के जागांचा कोटा लक्षात घेता या १६ हजार कर्मचाऱ्यांना आणखी किती तरी वर्षे फौजदारकीसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. म्हणून या उमेदवारांमधूनच नवीन प्रस्ताव महासंचालक कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.या प्रस्तावानुसार नायक पोलीस कॉन्स्टेबल (एनपीसी) हे पद रद्द करावे आणि त्याऐवजी या पदाचा दर्जा थेट फौजदारकीचा करावा, असा हा प्रस्ताव आहे. हे करीत असताना शासनाच्या तिजोरीवर फारसा ताण पडणार नाही. कारण बहुतांश पोलीस कर्मचारी हे पोलीस नायक पदाचे वेतन घेत आहे. त्यांना पदोन्नती दिल्यास केवळ ग्रेड-पेमध्ये वाढ होऊन १५०० ते १९०० रुपये इतकाच वेतनाचा भार पडणार आहे. मात्र त्या बदल्यात किमान १६ वर्षे सेवा पूर्ण झालेला दीर्घ अनुभवी पोलीस अधिकारी खात्याला तत्काळ उपलब्ध होणार आहे. शिवाय आधीच अनुभव असल्याने प्रशिक्षण तथा परिविक्षा कालावधीची दोन वर्षे व त्यावरील खर्च वाचणार आहे.

पाच वर्षात केवळ १२ टक्के नियुक्त्या२०१३ ते २०१८ या पाच वर्षात खात्यांतर्गत परीक्षा उत्तीर्ण झालेल्या केवळ दोन हजार ४७५ उमेदवारांना फौजदारपदी नियुक्ती दिली गेली. ही टक्केवारी केवळ १२.७६ एवढी आहे. महासंचालक कार्यालयाने जारी केलेल्या सेवा ज्येष्ठता यादीत १६ हजार २५६ उमेदवार फौजदार पदावरील बढतीसाठी पात्र ठरतात. मात्र खात्यांतर्गत फौजदारांच्या मंजूर पदांची संख्या केवळ २२४२ एवढी आहे. त्यामुळे उर्वरित पात्र उमेदवारांना फौजदार बनण्यासाठी आणखी किती काळ लागणार याचे उत्तर महासंचालक कार्यालयाकडे नाही.

टॅग्स :Policeपोलिस