शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
3
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
4
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
5
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
7
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
8
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
9
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
10
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
11
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
12
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
13
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
14
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
15
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
16
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
17
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
18
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
19
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
20
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video

गहू झोपला, मोहोर झडला

By admin | Updated: February 12, 2015 01:49 IST

विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटात मंगळवारी रात्री झालेल्या अकाली पावसाने जिल्ह्यात विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

यवतमाळ : विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटात मंगळवारी रात्री झालेल्या अकाली पावसाने जिल्ह्यात विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बहुतांश भागातील गहू झोपला असून बहरलेल्या आंब्याचा मोहोर झडला आहे. शिवाय कापूस पणन महासंघाचा कापूस १५ दिवसानंतर पुन्हा भिजला. काही भागात वीज पुरवठाही ठप्प झाला होता. बुधवारी संपूर्ण दिवसभर वीज सुरळीत करण्याचे काम कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून सुरू होते.यावर्षी खरिपापासूनच शेतकऱ्यांना निसर्ग प्रकोपाचा सामना करावा लागत आहे. उशिराचा पाऊस आणि नंतर ‘ब्रेक के बाद’च्या पावसामुळे संपूर्ण खरीप हंगाम हातचा गेला. सोयाबीनचे पीक काहींना एकरी ५० किलोही झाले नाही. शिवाय दर्जाही घसरला. यातून सुटका होत नाही तोच कपाशीनेही दगा दिला. एकीकडे उत्पादन कमी तर, दुसरीकडे कमी दर यामुळे शेतकरी हवालदिल झाला. यातून सुटका होत नाही तोच रबीतही अवकाळी पावसाचा मारा झेलावा लागत आहे. १५ दिवसांपूर्वी झालेला अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, कपाशी आणि भाजीपाला पिकाचे नुकसान झाले. यातून सावरच नाही तोच मंगळवारी रात्री पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा बसला.या पावसामुळे ३१ हजार २८० हेक्टरवरील गव्हाला फटका बसला आहे. पावसासह जोरदार वारा असल्याने ओंब्यावर आलेला गहू आडवा झाला. त्यामुळे गव्हाचे उत्पादन घटण्याचाही धोका आहे. यासोबतच भाजीपाला पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. आंबा बार मोठ्या प्रमाणात गळला. त्यामुळे यावर्षी गावरान आंब्याचे उत्पादनही घटण्याचा धोका आहे. अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका पणन महासंघाने खरेदी केलेल्या कापसाला बसला. यवतमाळ विभागातील सातही केंद्रात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक नुकसानीचा अंदाज घेणार आहे. काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात कापूस ओला झाला होता. असे नुकसान पुन्हा होऊ नये, यासाठी खबरदारीच्या सूचना होत्या. यानंतरही ताडपत्र्या उडाल्याने कापूस भिजला. मात्र नुकसानीचे प्रमाण कळू शकले नाही. यवतमाळ, कळंब, आर्णी, दिग्रस, पुसद आणि उमरखेड या संकलन केंद्रांवर झालेले नुकसान चमू शोधत आहे. हवामान खात्याने आणखी तीन दिवस सतर्कतेची सूचना दिली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस पणनची कापूस खरेदी बंद राहणार आहे. बिजोरा परिसरात पावसामुळे गहू पिकाचे प्रचंड नुकसान झाले. हजारो हेक्टर क्षेत्रातील गहू पावसामुळे जमीनदोस्त झाला. या प्रकारामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. बाभूळगाव परिसरात जवळपास दोन तास पाऊस झाला. सोंगलेल्या तुरीच्या पेट्या झाकण्यासाठी त्यांना रात्रीच शेताकडे धाव घ्यावी लागली. जोरदार वाऱ्यामुळे वीज पुरवठा खंडित झाल्याने काळोख पसरला होता. महागाव तालुक्यात यावर्षी उन्हाळी ज्वारी हा नवा प्रयोग शेतकऱ्यांनी केला. मात्र हे पीकही मंगळवारच्या पावसामुळे जमीनदोस्त झाले. शिवाय गव्हालाही फटका बसला. अनेक ठिकाणचे वृक्ष कोलमडले तर वीज पुरवठाही खंडित झाला होता. नुकसानीच्या पाहणीसंदर्भात तहसीलदार विकास माने आणि तालुका कृषी अधिकारी राजकुमार रणवीर यांना विचारले असता अद्याप तरी या संदर्भात कुठलीही कारवाई झाली नसल्याचे सांगितले. (लोकमत चमू)