शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या नावाखाली काय वाट्टेल ते..; लॉकेट, लाईट आणखीही बरेच..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 09:11 IST

अनलॉकची प्रक्रिया सुरू असून दैनंदिन व्यवहार नियमित केले आहे. अशातच संसर्गाचा धोका वाढला आहे. खासगी कार्यालये, दुकाने पूर्ण क्षमतेने सुरू आहे. नेमके हेच हेरुन काही उत्पादक कंपन्यांनी कोरोना नियंत्रणाची हमी देत आपला बाजार सुरू केला आहे.

ठळक मुद्देकोरोना नियंत्रणाचे दावे करणारी अनेक उत्पादने बाजारातन्यू व्हायरस शटआऊट लॉकेटअतिनिल अल्ट्राव्हायलेट लाईटचा सर्रास वापर, कॅन्सरचाही धोका

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये अशी प्रत्येकाची मानसिकता आहे. त्यासाठी सर्वच जण शक्य त्या उपाययोजना करण्यास तयार आहे. जनमानसातील कोरोनाची भीती ओळखून ती कॅश करण्याकरिता अनेक उत्पादने बाजारात आली आहे. त्याचे फायदेही तितक्याच सराईत पणे पटवून दिले जात असल्याने अनेक जण त्याला खरेदी करण्यासाठी धडपडत आहे.

अनलॉकची प्रक्रिया सुरू असून दैनंदिन व्यवहार नियमित केले आहे. अशातच संसर्गाचा धोका वाढला आहे. खासगी कार्यालये, दुकाने पूर्ण क्षमतेने सुरू आहे. नेमके हेच हेरुन काही उत्पादक कंपन्यांनी कोरोना नियंत्रणाची हमी देत आपला बाजार सुरू केला आहे. त्यासाठी न्यू व्हायरस शटआऊट असे लॉकेट गळ्यात घातल्यास तीन फुटाच्या परिघात कोरोनाचा विषाणू जिवंत राहत नसल्याचे सांगितले जात आहे. या न्यू व्हायरस शटआऊट लॉकेटची किंमतही हजाराच्यावरच आहे. अनेक जण आता हे लॉकेट गळ्यात घालून फिरताना दिसत आहे.

घरातील कोरोना विषाणू नष्ट करण्यासाठी अल्ट्राव्हायलेट लाईटचा प्रयोग केला जात आहे. मात्र अनेक जण हा प्रयोग मानवी शरीरासाठी घातक असल्याचे सांगतात. हा लाईट घरातील एका खोलीत काही मिनिट लावून ठेवल्यास तेथील सर्व प्रकारचे व्हायरस नष्ट होतात, असा दावा केला जात आहे. तर निर्जंतुकीकरणाच्या नावाखाली अल्ट्राव्हायलेट लाईट खासगी कार्यालयातील टेबल खुर्च्यांवरून फिरविला जात आहे. या उत्पादनाची किंमतही पाच हजारांच्यापुढेच आहे. ज्यांची आर्थिक क्षमता आहे असे अनेक जण या उत्पादनाची खरेदी करताना दिसत आहे. अल्ट्राव्हायलेट सारखे घातक किरणे उत्सर्जित करणारी उत्पादने बाजारात कुठल्याही निर्बंधाशिवाय विकली जात आहे. याचा मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. अतिनील किरणे मानवी शरीरावर पडल्यास त्यातून कॅन्सरसारखा दुर्धर आजार जडण्याची भीती व्यक्त होत आहे.

कोरोना नियंत्रणासाठी असलेली उत्पादने विकणाऱ्या कंपन्या अनेक दावे करीत आहे. त्याचे मार्केटिंग प्रतिनिधी उत्पादनाची माहिती देताना दिसतात. या दाव्यांना शास्त्रीय आधार काय हे मात्र कुणीच सांगायला तयार नाही. जनमाणसातील कोरोनाच्या भीतीला काही उत्पादकांनी संधी बनविल्याचे दिसून येते. याची शासकीय यंत्रणेने दखल घेण्याची गरज आहे.आधी काढ्यावर भर, नंतर दिसले दुष्परिणामकोरोना विषाणू संसर्गाचा विळखा वाढत असून रुग्णसंख्या साडेसात हजारांच्यापुढे गेली आहे. मृतांचाही आकडा वाढतो आहे. आता प्रत्येकालाच स्वत:सह कुटुंबाची चिंता सतावत आहे. कोरोना होऊच नये, त्याला प्रतिबंधक करावा यासाठी सुरुवातीच्या काळात आयुर्वेदातील उपचार, काढा, याशिवाय दैनंदिन वापरातील खाद्य पदार्थ यावर भर दिला जात होता. शरीरातील उष्णता वाढविण्यासाठी काढ्याचा प्रयोग अनेकांनी केला. त्याचे कमी जास्त प्रमाणात दुष्परिणामही जाणवले. मालेगाव काढा तर राज्यात प्रसिद्ध झाला होता. नंतर त्याचे अतिसेवनाने काय परिणाम झाले हेही वास्तव सर्वश्रृत आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस