शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
2
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
3
ZIM vs SA Test: खतरनाक 'सुपर स्पिन'! गोलंदाजाच्या भन्नाट फिरकीने केली फलंदाजांची 'दांडी गुल' (Video)
4
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट
5
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
6
अंबानी-अदानींना टाकले मागे! नागपूरच्या कंपनीने घडवला इतिहास! 'या' अब्जाधीशाची विक्रमी कमाई!
7
खळबळजनक! सोनमपासून प्रेरणा घेऊन बायकोने काढला नवऱ्याचा काटा, बाईकला GPS अन्...
8
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
9
विधानसभेला बंडखोरी केली, अपक्ष निवडणूक लढवली, काँग्रेसकडून बड्या नेत्याचं निलंबन अखेर मागे  
10
Accident Video: भयंकर... धडकी भरवणारा! हॉटेलच्या समोर कारने चौघांना चिरडले; अपघात सीसीटीव्हीत कैद
11
Mumbai: धक्कादायक! पतीला चोरीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून पत्नीवर बलात्कार; पैसे, दागिनेही लुबाडले
12
१ जुलैपूर्वी तिकीट काढलं असेल तर प्रवाशांना द्यावे लागतील अतिरिक्त पैसे? अखेर रेल्वेने केलं स्पष्ट
13
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरुचरित्र सप्ताह करायचा आहे? पारायण कसे करावे? पाहा, नियम व पद्धती
14
धक्कादायक! रिक्षावाल्याला थांबवलं, पैसे घेऊन येतो म्हणाला अन्...; गोरेगावमध्ये तरुणाने संपवले स्वतःचे आयुष्य
15
इराण-इस्रायल युद्धबंदीनंतर सोन्याच्या किमतीत पहिल्यांदाच सर्वात मोठी वाढ! चांदीही चमकली!
16
'या' अभिनेत्याने घेतली निलेश साबळेंची जागा, 'चला हवा येऊ द्या'च्या नव्या पर्वाचं सूत्रसंचालन करणार
17
ENG vs IND : १२३ वर्षांत जे घडलं नाही ते करून दाखवण्याचं चॅलेंज; इथं पाहा टीम इंडियाचा रेकॉर्ड
18
वनप्लस पुन्हा एकदा डबल धमाका करणार; एकात वनप्लस १३ चा कॅमेरा? कोणते फोन येतायत...
19
हुंड्यासाठी पती झाला हैवान! दागिने, AC साठी टॉर्चर; लग्नानंतर ३ दिवसांनी नववधूने संपवलं जीवन
20
५०० वर्षांनी गुरु-शनिचा पॉवरफूल योग: ९ राशींचे कल्याण, अपार लाभ; भरघोस भरभराट, बक्कळ पैसा!

विहीर लाभार्थ्यांचे उपोषण मागे

By admin | Updated: December 13, 2014 02:30 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत तालुक्यात पंचायत समितीच्या माध्यमातून सन २०१२-१३ मध्ये १९६ शेतकऱ्यांना

उमरखेड (कुपटी) : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत तालुक्यात पंचायत समितीच्या माध्यमातून सन २०१२-१३ मध्ये १९६ शेतकऱ्यांना सिंचनाची व्यवस्था उपलब्ध व्हावी, यासाठी राज्य सरकारने विहिरी मंजूर केल्या. यामध्ये कोर्टा या गावात आदिवासी बहुल भाग म्हणून १६ विहिरी मंजूर झाल्या. वर्षभरात विहिरींचे काम पूर्णत्वाकडे गेले असतानाही पंचायत समितीस्तरावर देयके मात्र थांबली होती. खोदकाम केलेल्या विहिरींची देयके मिळण्यासाठी कोरटा गावातील सोळाही शेतकऱ्यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. पंचायत समिती प्रशासनाच्या ठोस आश्वासनानंतर व राजकीय नेत्यांच्या मध्यस्थीनंतर या विहीर लाभार्थ्यांनी उपोषण मागे घेतले.महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमीसह अन्य विकास कामे आॅनलाईन केल्या गेल्याने कोरटा येथील सर्वच विहीर लाभार्थ्यांची देयके जिल्हा पातळीवरील कार्यालयात तांत्रिक अडचणींमुळे प्रलंबित झाली होती. उमरखेड पंचायत समिती अंतर्गत कोरटा ग्रामपंचायतीचे देयकेसुद्धा लांबणीवर पडली होती, अशी माहिती या उपोषणकर्त्यांना पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आहीर यांनी दिली. तसेच जिल्हा पातळीवर देयकाची बाब निदर्शनास आणून दिली. या लाभार्थ्यांना त्या वेळच्या ग्रामसेवकांनी आवश्यक त्या प्रमाणात सहकार्य केले नव्हते. कोरटा येथील विहीर लाभार्थी विजय साखरे, लक्ष्मण खुडे, लक्ष्मण तोरकड, परशराम शिरडे, जयवंता पोटे, मसाजी देवतळे, मुंगशीराम वाघमारे, शिवराम डाके, जयवंत पोटफोडे, अंबादास तिळेवाड, कुंडलिक पिटलेवार, देवराव पवने, जयवंत साखरे, शेषराव शेळके आणि देवराव शेळके आदी विहीर लाभार्थ्यांनी तब्बल एक वर्षांपासून देयकांसाठी सातत्याने पाठपुरावा केला. यातील तांत्रिक त्रुट्या काढून लवकरच सोळाही लाभार्थ्यांना कुशल देयके मिळतील, असे लेखी पत्र बीडीओंनी दिले. तसेच यामध्ये भाजपा सरचिटणीस रमेश चव्हाण शिवसेना तालुकाध्यक्ष अ‍ॅड.बळीराम मुटकुळे, संजय भंडारे, जिल्हा परिषद सदस्य मुन्ना पांढरे, ग्रामसेवक डी.पी. देवकर, विस्तार अधिकारी मुंडे, शामराव सुरोशे आदींनी मध्यस्थी केल्यानंतर या शेतकऱ्यांनी उपोषण मागे घेतले. (वार्ताहर)