शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ जिल्ह्यात आईबाबांनी केले चार कन्यारत्नांचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 12:29 IST

लेक वाचवा असा संदेश सरकारी स्तरावरून दिला जात असला तरी सुशिक्षित आणि उच्चभ्रू कुटुंबांमध्ये आजही मुलांसाठीच नवस बोलले जात आहे. मात्र एका मजूर दाम्पत्याच्या पोटी रविवारी एकाच वेळी चार मुली जन्मास आल्या.

ठळक मुद्देयवतमाळ जिल्ह्यातील पहिली घटना शासकीय रुग्णालयात दोन महिने उपचार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लेक वाचवा असा संदेश सरकारी स्तरावरून दिला जात असला तरी सुशिक्षित आणि उच्चभ्रू कुटुंबांमध्ये आजही मुलांसाठीच नवस बोलले जात आहे. मात्र एका मजूर दाम्पत्याच्या पोटी रविवारी एकाच वेळी चार मुली जन्मास आल्या. त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे या गरीब आईबाबांनी चारही कन्यारत्नाचे अत्यंत आनंदाने स्वागत केले.राणी प्रमोद राठोड (२२) रा. चिखली (रामनाथ) ता. दारव्हा या मातेने चार मुलींना जन्म दिला. राठोड दाम्पत्याला पहिली दोन वर्षाची मुलगी आहे. दुसऱ्या अपत्यासाठी राणी गर्भवती होती. तिची सोनोग्राफी यवतमाळात खासगीत करण्यात आली. त्यावेळी गर्भात चार अपत्य असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हे ऐकून राठोड दाम्पत्याला धक्काच बसला. रोज मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या या कुटुंबापुढे यक्षप्रश्न उभा ठाकला. ही समस्या घेऊन हे दाम्पत्य महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांना भेटले. मंत्र्यांनी पुढाकार घेत शासकीय रुग्णालयातील स्त्रीरोग विभागातील डॉक्टरांशी चर्चा केली. राणीची प्रकृती बेताची असल्याने चार जीवांचा गर्भ तिला झेपेल काय याचीही चर्चा झाली. शेवटी स्त्री रोग विभागाचे प्रमुख डॉ. रोहिदास चव्हाण यांनी हे आव्हान स्वीकारले. डॉ. श्रीकांत वराडे, डॉ. पूनम कुळसंगे, डॉ. भवय्या आणि डॉ. प्रशिव शाह यांनी राणीची दोन महिने काळजी घेतली. याशिवाय रुग्णसेवक विकास क्षीरसागर, वक्की पोरटकर, पवन शेंद्रे, चंदन नीत, जयपाल पवार, जगदीश कोटरे आदींनी वारंवार आवश्यक ती मदत केली. या सर्वांच्या प्रयत्नाला रविवारी दुपारी यश आले. राणीने एक नव्हे तर चार मुलींना जन्म दिला. वैद्यकीय महाविद्यालयातील ही पहिलीच घटना आहे. राज्यमंत्री संजय राठोड, संतोष ढवळे यांनी रुग्णालयात येऊन माता व मुलींची विचारपूस केली. यावेळी राणी राठोड हिने संजय राठोड यांना राखी बांधून आपली कृतज्ञता व्यक्त केली. पहिली मुलगी असताना आणखी चार मुली झाल्याने पिता म्हणून प्रमोद यांना अत्यानंद झाला. रोजमजुरी करून संसाराचा गाडा चालविणाऱ्या प्रमोद यांनी याबाबत कुठलीही तक्रार केली नाही. उलट सर्वांचे आभार मानत आनंदच व्यक्त केला.

टॅग्स :Healthआरोग्य