शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
3
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
4
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
5
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
6
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
7
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
8
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
9
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
10
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
11
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
12
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
13
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
14
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
15
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
16
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
17
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
18
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
19
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
20
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?

दुष्काळानेच दाखविला समृद्धीचा मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 21:55 IST

कधी काळी सधन समजल्या जाणाऱ्या तालुक्यातील खोपडी (बु.) गावाने सिंचनाअभावी अनेक वर्षे दुष्काळाची झळ सोसली. मात्र याच दुष्काळामुळे गावकऱ्यांना समृद्धीचा नवा मार्ग गवसला. वॉटर कप स्पर्धेत तालुक्यात दुसरा क्रमांक पटकावलेल्या खोपडीची यशोगाथा नक्कीच प्रेरणादायी आहे.

ठळक मुद्देखोपडीची यशोगाथा : श्रमदानातून १४ कोटी लिटर पाणीसाठवण क्षमतेची झाली निर्मिती

मुकेश इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : कधी काळी सधन समजल्या जाणाऱ्या तालुक्यातील खोपडी (बु.) गावाने सिंचनाअभावी अनेक वर्षे दुष्काळाची झळ सोसली. मात्र याच दुष्काळामुळे गावकऱ्यांना समृद्धीचा नवा मार्ग गवसला. वॉटर कप स्पर्धेत तालुक्यात दुसरा क्रमांक पटकावलेल्या खोपडीची यशोगाथा नक्कीच प्रेरणादायी आहे.केवळ दीड महिन्यात या गावात सह हजार ४५६ घनमीटर श्रमदान व एक लाख २४ हजार २६३ घनमीटर यंत्रकाम, असे एकूण एक लाख ३० हजार ७१९ घनमीटर काम गावात पूर्ण झाले. यामुळे गावात १३ कोटी ७१ लाख नऊ हजार लीटर पाणीसाठा तयार होऊन मोठ्या प्रमाणात पातळी वाढली. त्यामुळे गावाचा पाणी प्रश्न मिटला. शिवाय सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली. खोपडी (बु.) येथील जमीन सुपीक आहे. कधी काळी सिंचनाकरिता मुबलक पाणी मिळत असल्यामुळे खरीप, रबी हंगाम, तसेच फळबाग, भाजीपाला पिकांमध्ये वेगवेगळे प्रयोग करून भरघोस उत्पन्न घेतले जात होते. परंतु गेल्या काही वर्षांपासून पाण्याअभावी सिंचनाची समस्या जाणवू लागली. एवढेच नव्हे तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली. यामुळे गावाची स्थिती गंभीर बनली.गेल्या काही वर्षांपासून या भागात पर्जन्यमान चांगले नाही. शिवाय तिन्ही बाजूंनी माळरान डोंगर आणि उतारात गाव, अशी खोपडीची स्थिती असल्यामुळे पावसाचे पडलेले पाणी गावात न मुरता बाहेर निघून जात होते. ही बाब गावाच्या दुष्काळाला कारणीभूत असल्याचे तरुणांच्या निदर्शनास आले. पाणी अडविल्याशिवाय पातळी वाढणार नाही याची जाणीव त्यांना झाली. नंतर खोपडीची सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेकरिता निवड झाली. दत्तात्रय राहाणे यांनी गावकºयांच्या साथीने पुढाकार घेतला अन् तेथूनच खºया अर्थाने गावाच्या विकासाला सुरुवात झाली.पाणी फाऊंडेशनच्या समन्वयकांनी गावकºयांना स्पर्धेची माहिती दिल्यानंतर उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे यांनी गावात बैठक घेऊन गावकºयांचा उत्साह वाढविला. ८ एप्रिलला रात्री बारा वाजता श्रमदानाला सुरुवात झाली. ५00 घनमीटर सीसीटी, तीन शेततळे, २00 मीटर दगडीबांध, १४00 मीटर कंटूर बांध, दहा एलबीएस, तर यंत्राने १७ हजार घनमीटर सीसीटी, १५ शेततळे, तीन गॅबियन बंधारे, दोन सिमेंट नालाबांध, असे एकूण एक लाख ३० हजार ७१९ घनमीटर काम पूर्ण झाले. यामुळे १३ कोटी ७१ लाख लिटर पाणीसाठा तयार झाला.इतर गावांना प्रेरणादायी वाटगावात मोठ्या प्रमाणात पाणी पातळी वाढली. आता गावाच्या पिण्याच्या पाण्याची समस्या तर सुटलीच, सिंचनाकरिता पाणी उपलब्ध झाले. सर्वांनी एकदिलाने परिश्रम घेतले आणि यश संपादन केले. गावकºयांच्या घामाचा हा सुगंध अनेक वर्षे दरवळत राहील. खोपडीवासीयांचा हा प्रवास दुष्काळग्रस्त गावांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल, असा आहे.तालुक्यातून प्रथम येण्यासाठी गावकरी या स्पर्धेत ईर्षेने उतरले. मात्र द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागल्याने हिरमोड झाला. तथापि यानिमित्ताने सर्वांच्या परिश्रमामुळे भरपूर कामे झाली. त्याचा चांगला लाभ गावाला होईल. ही बाब कोणत्याही पुरस्कारापेक्षा निश्चितच मोठी आहे.- दत्तात्रय राहणे, खोपडी.