शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी हाहाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 23:37 IST

विहिरी कोरड्या पडल्या. हातपंपाची पातळी खोल गेली. पाणीपुरवठा योजना विविध कारणांमुळे बंद पडल्या. तब्बल ३३ गावांमध्ये पाण्यासाठी हाहाकार आहे. तरीही प्रशासन आणि लोकप्रतिनिधींची उदासीनता दिसून येत आहे.

ठळक मुद्देनेर तालुक्यातील ३३ गावे तहानलेली : प्रशासन आणि लोकप्रतिनिधी उदासीन

किशोर वंजारी ।लोकमत न्यूज नेटवर्कनेर : विहिरी कोरड्या पडल्या. हातपंपाची पातळी खोल गेली. पाणीपुरवठा योजना विविध कारणांमुळे बंद पडल्या. तब्बल ३३ गावांमध्ये पाण्यासाठी हाहाकार आहे. तरीही प्रशासन आणि लोकप्रतिनिधींची उदासीनता दिसून येत आहे. प्रभावी उपाययोजना होत नसल्याने नागरिकांच्या संयमाचा बांध फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.बहुतांश प्रकल्प कोरडे पडले आहे. पाण्यासाठी नागरिकांना जीवाचा आटापिटा करावा लागत आहे. पाण्यासाठी मजुरी पाडावी लागत आहे. रानोरान भटकूनही पुरेसे पाणी उपलब्ध होत नाही. तळपत्या उन्हात डोक्यावर गुंड घेऊन पाण्यासाठी दूरवर भटकणाऱ्या महिलांना असह्य वेदना सहन कराव्या लागत आहे.आजंती(खाकी) हे गाव पाणीटंचाईसाठी प्रसिद्ध आहे. लाखो रुपयांच्या योजना या गावासाठी आल्या. पाण्याची टाकी उभी झाली. मात्र मागील दोन वर्षांपासून नळ सुरू झाले नाही. पाणीप्रश्न सोडविण्याच्या मागणीसाठी प्रशासनाला निवेदन देण्यासाठी गेलेल्या तीन युवकांना अपघातात आपला जीव गमवावा लागला होता. तरीही प्रशासन याविषयी गंभीर नाही. मोझर गावातील विहिरी, कूपनलिका कोरड्या झाल्या आहे. नागरिक दिवसरात्र पाण्यासाठी भटकत आहे. घुई या गावाला ‘आमचे गाव, आमचा विकास’ अंतर्गत दहा लाख रुपये प्राप्त झाले आहेत. ही रक्कम ग्रामपंचायतीच्या खात्याची शोभा वाढवित आहे.मांगलादेवी, वटफळी, परजना, उमरठा आदी गावे पाणीटंचाईने होरपळून निघाली आहे. पंचायत समितीकडून कृती आराखडा तयार केला जातो. मात्र कायमस्वरूपी उपाययोजना होण्याच्यादृष्टीने प्रयत्न केले जात नाही. विहीर अधिग्रहण, तात्पुरती नळ योजना दुरुस्ती यापुढे कृती आराखडा सरकत नाही. दरवर्षीचाच कित्ता याहीवेळी गिरविला गेला. तालुक्यात एवढी गंभीर परिस्थिती निर्माण झालेली असताना प्रशासन हातावर हात ठेऊन बसले आहे, तर लोकप्रतिनिधींना समस्याग्रस्त भागात फिरण्यासही सवड नाही. नागरिकांमध्ये मात्र कमालीचा रोष आहे.सिंदखेड येथे वसुलीचा तगादापाण्यासाठी नागरिकांची पायपीट सुरू असताना सिंदखेड ग्रामपंचायतीने थकीत बिलासाठी नळ जोडण्या कापण्याचा ठराव घेतला. त्याच कारणावरून हाणामारीचे प्रकारही घडत आहे. याविषयी गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली. या गावात आठ दिवसातून एकदा नळाला पाणी सोडले जात आहे. तरीही पाणीकराच्या वसुलीसाठी लोकांना त्रस्त करून सोडले जात आहे. ग्रामपंचायत कर्मचारी नागरिकांच्या रोषाचे बळी ठरत आहे. श्यामराव राठोड यांना मारहाणीचा प्रकारही या गावात घडला. पाण्याचा गंभीर प्रश्न लक्षात घेता वसुलीची कारवाई थांबविली जावी, अशी मागणी मिलन राठोड यांनी केली आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई