शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पाणी टँकरला ‘जीपीआरएस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 21:37 IST

नगरपरिषदेच्या अखत्यारीतील विहिरीतून पाण्याचा मोफत उपसा करून विकण्याचा गोरखधंदा सध्या शहरात सुरू आहे.

ठळक मुद्देयवतमाळ नगरपरिषदेचा निर्णय : टंचाई कक्षात मिळणार वितरणाची स्थिती

रूपेश उत्तरवार।ऑनलाईन लोकमतयवतमाळ : नगरपरिषदेच्या अखत्यारीतील विहिरीतून पाण्याचा मोफत उपसा करून विकण्याचा गोरखधंदा सध्या शहरात सुरू आहे. या पाण्याच्या व्यवसायाला चाप बसविण्यासाठी नगरपरिषदेने अधिग्रहित केलेल्या टँकरवर जीपीआरएस सिस्टीम (ट्रॅकर) लावण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या १५ टँकरला असे ट्रॅकर लावण्यात आले असून नगरपरिषदेत टंचाई कक्षातून यावर नियंत्रण ठेवले जाणार आहे. टंचाई निवारण्यासाठी विविध उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा हा एक प्रयत्न होय.यवतमाळ शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नळाला महिनाभरानंतरही पाणी येत नाही. परिणामी नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागते. परंतु काही खासगी टँकरधारक आपण अधिग्रहित केलेले टँकरधारक असल्याचे सांगून नगरपरिषदेच्या अखत्यारीतील विहिरीतून पाण्याचा मोफत उपसा करतात आणि त्याची गावात विक्री करीत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नाईलाजाने नागरिकांना पैसे मोजून टँकर घ्यावे लागते. हा पाण्याचा व्यवसाय मोडून काढण्यासाठी नगरपरिषदेने एक निर्णय घेतला आहे. अधिग्रहित केलेल्या प्रत्येक टँकरवर मोफत पाणी असा फलक लावावा लागणार आहे. त्यावर नगरसेवकाचे आणि वार्डाचे नावही लिहिले जाणार आहे. या टँकरचा क्रमांक नगरपरिषदेकडे राहणार आहे. विशेष म्हणजे नगरपरिषदेने अधिग्रहित केलेल्या प्रत्येक टँकरवर जीपीआरएस सिस्टीम बसविण्यात येणार आहे. त्यामुळे टँकर कोणत्या भागात पाणी घेऊन पोहोचले, प्रत्यक्ष सांगितलेल्या ठिकाणीच टँकर पोहोचला काय याची माहिती तत्काळ नगरपरिषदेला मिळणार आहे. तसेच कमी फेºया मारून अधिक बिल काढणाºया टँकरधारकांवरही या प्रणालीमुळे चाप बसणार आहे.नगरपरिषदेत यासाठी टंचाई कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्या ठिकाणी लावलेल्या यंत्रणेत शहरातील सर्वच टँकरची स्थिती दिसणार आहे. तसेच टँकरच्या स्थितीची माहिती नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाºयांना तत्काळ कळविली जाणार आहे. यामुळे टँकरच्या हेराफेरीला आळा बसून शहरातील पाणी वितरण व्यवस्था सुकर होणार आहेनगरसेवकाला एसएमएसशहरात १२ दिवसानंतर नळाचे पाणी सोडण्याचे नियोजन आहे. परंतु १२ दिवसानंतरही अनेक भागात पाणी पोहोचत नाही. काही भागात तर महिना झाला तरी नळ आले नाही. आता नळ येत असलेल्या भागातील नगरसेवकाला जीवन प्राधिकरणातून मोबाईलवर संदेश जाणार आहे. त्यासाठी शहरातील नगरसेवकाचा ग्रुप तयार करण्यात आला आहे. तसेच ज्या भागात नळ येणार आहे, त्या भागात आॅटोरिक्षाच्या मदतीने ध्वनीक्षेपकावरून माहिती दिली जाणार आहे. तसेच सोडलेले पाणी त्या भागात पोहोचले किंवा नाही याचीही माहिती नगरसेवकांनी प्राधिकरणाला द्यावयाची आहे. पाणी पोहोचत नसल्यास त्या भागात टँकरची व्यवस्था करावयाची आहे.मनुष्यबळाचा तुटवडायवतमाळ शहरातील ७९ विहिरींची साफसफाई करावी लागणार आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नगरपरिषदेने स्वच्छता मोहीम हाती घेतली. परंतु विहीर स्वच्छ करण्यासाठी मनुष्यबळाचा तुटवडा जाणवत आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा