आॅनलाईन लोकमतउमरखेड : तालुक्याची जीवनदायीनी पैनगंगा नदी आटल्याचा फटका उमरखेड शहराच्या पाणीपुरवठ्याला बसला आहे. शहराचा पाणीपुरवठा सोमवारपासून ठप्प झाला असून इसापूर धरणाचे पाणी सोडले तरच पाच दिवसानंतर उमरखेडकरांना पाणी मिळण्याची शक्यता आहे. सध्या शहरातील सुमारे ५० हजार नागरिकांना या पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.उमरखेड शहराला पैनगंगा नदी पात्रातून पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी तालुक्यातील बेलखेड येथे बंधारा बांधण्यात आला आहे. त्या ठिकाणी पाणी अडवून पाईपलाईनद्वारे उमरखेड शहरातील ५० हजार नागरिकांना पाणी पुरवठा केला जातो. परंतु यावर्षी अपुरा पाऊस झाला. त्यामुळे पैनगंगा नदी पात्र कोरडे पडले. इसापूर धरणातही अत्यल्प जलसाठा आहे. परिणामी हिवाळ्यातच पाणी टंचाई जाणवू लागली. त्यातच बेलखेड येथील बंधाºयातील पाणी संपले. त्यामुळे सोमवारपासून उमरखेड शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. ५० हजार नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. नगरपरिषदेने कोणतेही पर्यायी उपाययोजना केली नाही. त्यामुळे नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. दुसरीकडे इसापूर धरणाचे पाणी पैनगंगेच्या पात्रात सोडल्यास पाच दिवसानंतर पाणी मिळण्याची शक्यता आहे.नदीपात्रात खड्डे खोदण्याचा प्रयत्नउमरखेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पैनगंगेचे पात्र काही महिन्यापूर्वीच कोरडे पडले. परंतु बंधाºयात पाणी असल्याने उमरखेडकरांना पाणी पुरवठा होत होता. आता सोमवारपासून पाणीपुरवठा ठप्प झाल्याने नगरपरिषदेने पैनगंगेच्या पात्रात जेसीबीने खड्डे खोदण्याचा प्रयत्न केला आहे. याद्वारे पाणी बंधाºयात आणण्याचा प्रयत्न आहे. मात्र केवळ एक दिवस पुरेल एवढेच पाणी मिळण्याची शक्यता आहे. परंतु अपुरेच पाणी मिळेल.पैनगंगा नदी आटली आहे. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्यात येत आहे. इसापूर धरणातून पैनगंगेच्या पात्रात पाणी सोडण्याची मागणी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे करण्यात आली आहे. नदीपात्रात पाणी येताच पूर्ववत पाणीपुरवठा करण्यात येईल.- गणेश चव्हाणमुख्याधिकारी, उमरखेड
उमरखेड शहराचा पाणीपुरवठा ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 22:11 IST
तालुक्याची जीवनदायीनी पैनगंगा नदी आटल्याचा फटका उमरखेड शहराच्या पाणीपुरवठ्याला बसला आहे.
उमरखेड शहराचा पाणीपुरवठा ठप्प
ठळक मुद्दे५० हजार नागरिकांना फटका : पैनगंगा नदी आटल्याचा परिणाम