शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

पेटूर, नायगावात टँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 21:41 IST

यंदाच्या मोसमात अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने तालुक्यात कोरड्या दुष्काळाचे सावट आहे. जवळपास पाण्याचे सर्वच स्त्रोत आटल्याने नागरिकांची पाण्यासाठी दमछाक होत आहे.

ठळक मुद्देपाणी पेटले : नागरिकांची पाण्यासाठी धावाधाव, सावंगीतही टँकरची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : यंदाच्या मोसमात अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने तालुक्यात कोरड्या दुष्काळाचे सावट आहे. जवळपास पाण्याचे सर्वच स्त्रोत आटल्याने नागरिकांची पाण्यासाठी दमछाक होत आहे. परिस्थिती बिकट झाल्याने तालुक्यातील पेटूर व नायगाव (खु) या गावात टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे.अन्य गावांमध्येही पाण्याची बिकट अवस्था आहे. गावातील विहीरी व हातपंपांनी तळ गाठला आहे. परिणामी नागरिकांचे पाण्यासाठी प्रचंड हाल सुरू आहेत. वणी येथून आठ किलोमिटरवर असलेल्या पेटूर गावात दरवर्षीच पाण्याची भीषण टंचाई निर्माण होते. तिच अवस्था नायगाव (खु.) येथील आहे. या दोनही गावांत दररोज टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. टँकरचे पाणी गावातील सार्वजनिक विहीरीत सोडले जाते. त्यानंतर गावकरी त्या पाण्याचा वापर करतात. पेटूरमध्ये दररोज २४ हजार लिटर क्षमतेचे पाण्याचे टँकर पाठविले जात आहे. नायगावातही तिच परिस्थिती आहे. गावात टँकर पोहचताच, पाणी मिळविण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड उडते. मात्र या टँकरच्या पाण्याने एक हजार ७२ लोकसंख्या असलेल्या या गावाची तहान भागत नाही. मिळालेल्या पाण्यात गरज भागली नाही, तर गावकऱ्यांना दूरवरील शेतातून पाणी आणून आपली गरज भागवावी लागत आहे.वणी तालुक्यातील सावंगी (नवीन) येथेही पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून तेथेही टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची गरज निर्माण झाली आहे. तसा प्रस्तावही वणी पंचायत समितीने वरिष्ठांकडे पाठविला आहे. तालुक्यातील कुर्ली, पिंपरी कायर, पेटूर व वरझडी बंडा या गावांमध्ये विहीरीचे अधिग्रहण करण्यात आले आहे, तर तालुक्यातील गोपालपूर, तेजापूर व निंबाळा (बु.) येथे विहीरीचे अधिग्रहण करण्याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात आला आहे.पाणीपुरवठा उपविभागाची उदासीनतागेल्या १५ वर्षांपासून पेटूर येथील नागरिक दर उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाईचा सामना करतात. मागील आठवड्यात या गावातील महिलांनी गटविकास अधिकाºयांना घेराव घालून पाणी टंचाईचे निवारण करण्याची मागणी केली होती. पेटूर येथील पाणी टंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी मानकी येथे बोअर खोदण्यात आली. या बोअरवेलला मुबलक पाणी आहे. नळयोजनेच्या माध्यमातून या बोअरमधून पेटूर गावापर्यंत पाणी पोहचविण्याची जबाबदारी वणी येथील पाणी पुरवठा उपविभागाची आहे. मात्र बोअर तयार होऊन महिना लोटला असला तरी नळयोजनेचे काम सुरू करण्यात न आल्याने नागरिकांध्ये संताप व्यक्त होत आहे.

टॅग्स :Waterपाणी