शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

दारव्ह्यात पुराचे पाणी घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 22:07 IST

शहरात थोडासा जरी पाऊस जरी पडला, तरी पूर येणाऱ्या लेंडी नाल्याने १५ व १६ आॅगस्टला कोसळलेल्या जोरदार पावसामुळे शहरवासीयांना वेठीस धरले. त्यामुळे दारव्हा शहरावरील लेंडी नाल्याचे संकट कधी टळणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ठळक मुद्देलेंडी नाल्यामुळे धोका वाढला : वाहतुकीचा खोळंबा, नित्याचाच प्रकार

मुकेश इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : शहरात थोडासा जरी पाऊस जरी पडला, तरी पूर येणाऱ्या लेंडी नाल्याने १५ व १६ आॅगस्टला कोसळलेल्या जोरदार पावसामुळे शहरवासीयांना वेठीस धरले. त्यामुळे दारव्हा शहरावरील लेंडी नाल्याचे संकट कधी टळणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.लेंडी नाल्याला पूर आला, की जागोजागी पाणी तुंबते. तुंबलेले पाणी आजूबाजूच्या नगरांतील घरे, दुकानांमध्ये शिरते. रस्त्यावर पाणी साचून वाहतुकीचा खोळंबा होतो. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. जुने व नवीन शहराच्या मध्यभागातून हा लेंडी नाला वाहतो. रेल्वे स्टेशन परिसर, चिंतामणीनगर, स्वामी समर्थनगर, गोळीबार चौक, वर्षा टॉकीज परिसर, असा प्रवास करीत या नाल्याचे पाणी शहराबाहेर जाते. नाला कच्च्या स्वरूपाचा असल्याने त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष वाढतात. त्यामुळे दरवर्षी नगरपरिषदेला मान्सूनपूर्वी हा नाला जेसीबी मशीनद्वारे स्वच्छ करावा लागतो. तरीसुद्धा पूर्णपणे नाला स्वच्छ होत नाही.काही भागात मशीनच्या कामामुळे दिवसेंदिवस नाल्याचा आकार मोठा होत आहे. नाल्यात वाढलेल्या झाडाझुडपांमुळे कचरा अटकून जागोजागी पाणी थोपून राहते. तेच पाणी आजूबाजूच्या परिसरात शिरते. थोडासा पाऊस पडला, तरी नाल्याला पूर येतो. १५ व १६ आॅगस्टला कोसळलेल्या जोरदार पावसामुळे या नाल्याला मोठा पूर आला. पुराचे पाणी चिंतामणीनगर, स्वामी समर्थनगर, महावीर कॉलनी, बस स्थानक परिसर, गोळीबार चौक, आर्णी रोड आदी परिसरांमध्ये शिरून अनेक घरे व दुकानांचे नुकसान झाले. त्यामुळे नागरिकांना फटका बसला.बस स्थानकातील प्रवाशांचे हाल झाले. यवतमाळ, कारंजा, आर्णी राज्य मार्गाला तलावाचे स्वरूप आले होते. त्यामुळे तब्बल चार तास वाहतूक ठप्प होती. त्याचा अनेकांना त्रास सहन करावा लागला. शहरवासीयांना वेठीस धरणारा ही समस्या कधी सुटेल, असा प्रश्न नागरिक विचारत आहे.नाल्याचे बांधकाम आवश्यकलेंडी नाल्यामध्ये जलशुद्धीकरण केंद्रासमोरील टेकडीवरून पाणी येते. हे पाणी नाल्यात शिरू न देता तेथे एखादा बंधारा बांधणे आवश्यक आहे. शहराच्या एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत नाल्याचे बांधकाम करणे व मध्ये असलेल्या दोन पुलांची उंची वाढविण्याची गरज आहे. यामुळे पावसाळ्यात होणारा नाल्याचा उपद्रव कायमचा बंद होऊ शकतो. तसेच इतरवेळी साचून राहणाऱ्या पाण्यामुळे होणारी घाण नष्ट होऊन नागरिकांना दिलासा मिळू शकतो. नगरपरिषदेने याकरिता पुढाकार घेऊन नाल्याचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर