शहरं
Join us  
Trending Stories
1
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
2
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
3
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
6
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
7
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
8
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
9
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
10
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
11
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
12
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
13
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
14
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
15
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
16
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
17
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
18
"काँग्रेस सगळ्या निवडणुका लढायला पुढे जाते, पण निकाल लागल्यानंतर कळतं...", संजय राऊत यांचा टोला
19
HDFC बँकेच्या दुबई शाखेत मोठा गैरव्यवहार; ५ वर्षांपर्यंत लपवलं सत्य, अतनु चक्रवर्तींच्या राजीनाम्याशी संबंध?
20
'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, ट्रम्पवर कडी करा...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याच्या दुर्गम भागातील गावांना पाणीटंचाईची झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 05:00 IST

जिल्हा परिषदेने पाणीटंचाई निवारणार्थ तब्बल सात कोटी ८० लाख ३३ हजारांचा कृती आराखडा तयार केला. त्यात ५८९ गावांमध्ये संभाव्य पाणीटंचाई गृहीत धरण्यात आली होती. ऑक्टोबर ते डिसेंबर, जानेवारी ते मार्च आणि एप्रिल ते जून दरम्यान या गावांमध्ये विविध उपाययोजना प्रस्तावित केल्या होत्या. मार्चपर्यंत पाणीटंचाईची दाहकता कमी होती. मात्र एप्रिल महिना सुरू होताच गावे व वाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

ठळक मुद्दे१४ टँकर सुरू : ३६ खासगी विहिरी अधिग्रहित

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : एप्रिल महिन्याच्या मध्यास जिल्ह्यातील दुर्गम भागातील गावांना पाणीटंचाईची झळ बसू लागली आहे. या गावांसाठी १४ टँकर सुरू करण्यात आले असून, ३६ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले.जिल्हा परिषदेने पाणीटंचाई निवारणार्थ तब्बल सात कोटी ८० लाख ३३ हजारांचा कृती आराखडा तयार केला. त्यात ५८९ गावांमध्ये संभाव्य पाणीटंचाई गृहीत धरण्यात आली होती. ऑक्टोबर ते डिसेंबर, जानेवारी ते मार्च आणि एप्रिल ते जून दरम्यान या गावांमध्ये विविध उपाययोजना प्रस्तावित केल्या होत्या. मार्चपर्यंत पाणीटंचाईची दाहकता कमी होती. मात्र एप्रिल महिना सुरू होताच गावे व वाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. दुर्गम भागातील खेड्यांमध्ये टंचाईची तीव्रता अधिक आहे. सध्या पुसद, आर्णी, यवतमाळ आणि कळंब तालुक्यातील काही गावांमध्ये १४ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यात पुसद तालुक्यातील खंडाळा-अमृतनगर, लोहारा (खुर्द), बुटी (इजारा), लोहारा (इजारा), सावरगाव (बंगला), मारवाडी (खु.), कारला, म्हैसमाळ, वडसद, जवळा, आर्णी तालुक्यातील सुधाकरनगर आणि पाळोदी तर यवतमाळ तालुक्यातील इचोरी व कळंब तालुक्यातील किनवट येथे १४ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यापैकी काही गावांमध्ये टँकरच्या प्रत्येकी दोन तर काही गावांमध्ये प्रत्येकी एक फेरी मारली जात आहे. तब्बल १९ हजार ३६२ नागरिकांना टँकरने पाणी पुरविले जात आहे.  

४७ हजार नागरिकांची तहान विहिरीवर  प्रशासनाने ४० गावांतील ४७ हजार ५६२ नागरिकांसाठी ३६ खासगी विहिरींचे अधिग्रहण केले आहे. याशिवाय चार ठिकाणी बोअरवेलद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. आर्णी तालुक्यात १४, दिग्रसमध्ये सात, उमरखेडमध्ये चार, वणी येथे पाच, पुसदमध्ये दोन, यवतमाळमध्ये एक, बाभूळगावमध्ये दोन तर कळंब तालुक्यातील एका गावात खासगी विहिरीचे अधिग्रहण करण्यात आले आहे. महागाव, घाटंजी, दारव्हा, केळापूर आणि झरी जामणी या पाच तालुक्यांत एकाही खासगी विहिरीचे अधिग्रहण करण्यात आले नाही. 

मे महिन्यात दाहक स्थिती   एप्रिल महिन्याच्या मध्यास जिल्ह्यातील अनेक गावे तहानली आहेत. टँकर आणि खासगी विहिरी अधिग्रहण करून तेथील नागरिकांची तहान भागविली जात आहे. ही स्थिती मे महिन्यात आणखी दाहक होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे २०१९ आणि २०२० मध्ये कमी पाऊस होऊनही जिल्ह्यात टँकरची संख्या कमी होती. गेल्या वेळी समाधानकारक पाऊस होऊनही जिल्ह्यात १४ टँकर सुरू करावे लागले. त्यामुळे मे महिन्यात स्थिती आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :Waterपाणी