शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
2
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
3
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
4
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
5
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
6
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
7
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
8
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार
9
इंजिनीअर तरुणाने आईच्या मदतीने पत्नीला संपवलं, मृतदेह चादरीत गुंडाळला अन्...; कारण ऐकून होईल संताप!
10
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला बाप्पाला दूर्वा सोडून का वाहिली जाते तुळस?
11
ड्रीम११ आणि My11Circle चे भविष्य धोक्यात? ऑनलाइन गेमिंग बिलामुळे 'हे' प्लॅटफॉर्म कायमचे बंद होणार?
12
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
13
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
14
पत्नीचा मृतदेह पाहून पतीला बसला धक्का, एका कोपऱ्यात बसला आणि तासाभरातच...  
15
Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई
16
Ganesh Chaturthi 2025: बाप्पा आपल्या भेटीला येतोय, पण कधी 'या' गुप्त गणेश मंदिरात बाप्पाची भेट घ्या!
17
शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली 'सावली', प्राप्ती रेडकरचा ग्लॅम लूक; सोबत दिसली 'भैरवी'
18
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
19
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
20
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष

घाटंजी तालुक्यातील ५० गावांत जलक्रांती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 21:39 IST

पाणी फाउंडेशनपुरस्कृत सत्यमेव जयते वाटर कप स्पर्धेत तालुक्यातील ५० गावे दुष्काळावर मात करण्यासाठी सहभागी झाली आहे. स्पर्धची सुरुवात ८ एप्रिलच्या पहील्याच ठोक्याला रात्री १२ वाजून एक मिनिटाने श्रमदानाचा बिगुल वाजवून करण्यात आली.

ठळक मुद्देतुफान आलंया : वाटर कप स्पर्धेला सुरूवात

लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : पाणी फाउंडेशनपुरस्कृत सत्यमेव जयते वाटर कप स्पर्धेत तालुक्यातील ५० गावे दुष्काळावर मात करण्यासाठी सहभागी झाली आहे. स्पर्धची सुरुवात ८ एप्रिलच्या पहील्याच ठोक्याला रात्री १२ वाजून एक मिनिटाने श्रमदानाचा बिगुल वाजवून करण्यात आली. कुठे सलग समतल चर (सीसीटी), अनघड दगडी बांध (एलबीएस), तर कुठे शोषखड्डे खोदून स्पर्धेची सुरुवात झाली. काही गावांनी वृक्ष संवर्धनाकरिता खड्डे खोदून स्पर्धेची सुरूवात केली.तालुक्यातील अनेक गावांनी दुष्काळावर मात करण्यासाठी स्पर्धेत सहभाग घेतला आहे. या स्पर्धेच्या सुरूवातीचा क्षण अन् क्षण त्यांच्यासाठी महत्वाचा असल्याचे दर्शविण्यासाठी पहिल्याच रात्री पहिल्या मिनिटाला विविध कामांची सुरूवात करण्यात आली. पांढुर्णा खु, रामपूर, उंदरणी, कापसी, चांदापूर, खापरी, कालेश्वर, मांडवा, बोधडी, भांबोरा, शिरोली, ससाणी आदी गावांनी स्पर्धेत सक्रिय सहभाग नोंदवून दुष्काळाशी दोन हात करत जलसंधारणाच्या कामांना सुरुवात केली.लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत तालुक्यात जल चळवळ उभी करणे व एवढ्या उत्साहाने चळवळीची सुरुवात होणे, यात पाणी फाउंडेशनच्या चमूचे कष्टही महत्त्वाचे ठरले आहे.अनेक गावांनी स्पर्धेपूर्वी करता येणारी कामे पूर्ण केली असून आता तत्परतेने गावकरी श्रमदानाला लागले आहे. आपल्या धकाधकीच्या कामातून सकाळ व सायंकाळी वेळ काढून गाव पाणीदार करण्यासाठी सर्वांची धडपड सुरू झाली आहे.ग्रामस्थांमध्ये उत्साहआपले गाव पाणीदार करण्यासाठी गावकऱ्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे. सत्यमेव जयते वाटर कप स्पर्धेची एवढी जोरदार सुरूवात व गावकऱ्यांचा उत्साह अविश्वसनीय वाटत आहे. श्रमदात्यांचे हजारो हात झटत असल्याने तालुक्यात जलक्रांतीची सुरूवात होत असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धा