शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

पाण्यासाठी उपविभागातील ग्रामीण नागरिकांची होरपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 22:35 IST

वणी उपविभागातील वणीसह मारेगाव व पांढरकवडा उपविभागातील झरी या तीन तालुक्यातील ग्रामीण नागरिकांची पाण्यासाठी अक्षरश: होरपळ सुरू आहे. दरवर्षी प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजना तोकड्या पडत असल्याने या नागरिकांचा पाण्यासाठीचा संघर्ष अद्यापही संपलेला नाही.

ठळक मुद्देउपाययोजना कागदोपत्री : शेतातून ड्रमद्वारे आणावे लागते पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : वणी उपविभागातील वणीसह मारेगाव व पांढरकवडा उपविभागातील झरी या तीन तालुक्यातील ग्रामीण नागरिकांची पाण्यासाठी अक्षरश: होरपळ सुरू आहे. दरवर्षी प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजना तोकड्या पडत असल्याने या नागरिकांचा पाण्यासाठीचा संघर्ष अद्यापही संपलेला नाही. झरी या आदिवासीबहुल तालुक्यातील नागरिकांची अवस्था अतिशय बिकट आहे.ज्या गावातील पाण्याचे स्त्रोत आटले, त्या गावातील नागरिकांना बैलबंडीवर ड्रम ठेऊन त्याद्वारे दूरवरच्या शेतातील विहीर अथवा अन्य स्त्रोतातून पिण्यासाठी व वापरण्यासाठी पाणी आणावे लागत असल्याचे चित्र ग्रामीण भागात पहावयास मिळत आहे. म् मागील वर्षी वणी तालुक्यातील कुर्ली, पिपरी कायर या दोन गावांमध्ये पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली होती. यंदा मार्च महिन्यानंतर वणी तालुक्यातील वडगाव (टिप), कुर्ली, पिंपरी (कायर), वरझडी (बंडा), गोपालपूर, खांदला, गोपालपूर (वरझडी) या सहा गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली. या टंचाईवर मात करण्यासाठी बोअरवेल अधिग्रहीत करण्यात आल्या. मात्र त्या तोकड्या ठरत आहे.ग्रामपंचायतींची उदासीनताझरी आणि मारेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये सध्या भीषण पाणी टंचाई आहे. मात्र संबंधित ग्रामपंचायतींनी टंचाईसंदर्भात पंचायत समितीकडे प्रस्तावच पाठविला नसल्याचे वास्तव आहे. मारेगाव तालुक्यातील कान्हाळगाव (वाई) येथील नागरिकांनी गावातील पाणी टंचाईच्या मुद्यावरूनच मतदानावर बहिष्कार टाकला होता, हे विशेष. झरी तालुक्यात अद्याप एकाही गावातून पाणीटंचाई संदर्भात प्रस्ताव पंचायत समितीकडे सादर करण्यात आला नाही. तालुक्यातील शिबला, निमणी व इतर पठार भागातील पाण्याची पातळी खोल गेली आहे. झमकोल, निमणी, वल्लासा, राजनी शिबला, रामपूर, हिरापूर (जुने) अशा काही गावांत पाणी टंचाईचे सावट आहे. अनेक गावांत नळयोजनेद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यास मोठी समस्या निर्माण होते.नियम डावलून बोअरवेलचे खोदकामगेल्या काही वर्षांत पर्जन्यमान अल्प राहत असल्याने जमिनीतील पाण्याची पातळी खोल गेली आहे. परिणामी २०० किंवा त्यापेक्षा अधिक फुटावरच पाणी लागत आहे. मात्र नियमानुसार २०० फुटापेक्षा अधिक खोलीची बोअरवेल खोदता येत नाही. मात्र पाणी टंचाईमुळे अनेकजण २०० फुटापेक्षा अधिक खोल बोअरवेलचे खोदकाम करीत आहेत. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाई