शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

पाणी वितरण नगरपरिषद कर्मचाऱ्यांकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 00:10 IST

पाणी वाटपात दुजाभाव होत असल्याच्या तक्रारीनंतर आता नगरसेवकांऐवजी नगरपरिषद कर्मचारी यवतमाळ शहरात टँकरने पाणी वितरण करणार आहे. या संदर्भातील आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले असून या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश मुख्याधिकाऱ्यांना दिले आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : यवतमाळातील टँकरचा पाणीपुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पाणी वाटपात दुजाभाव होत असल्याच्या तक्रारीनंतर आता नगरसेवकांऐवजी नगरपरिषद कर्मचारी यवतमाळ शहरात टँकरने पाणी वितरण करणार आहे. या संदर्भातील आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले असून या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश मुख्याधिकाऱ्यांना दिले आहे.यवतमाळ शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. टँकरशिवाय पर्याय नाही. शहरात सध्या नगरसेवकांच्या नेतृत्वात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र यात दुजाभाव होत असल्याच्या अनेक तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे दाखल झाल्या. यातून गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी आता पाणी वितरण नगरसेवकांऐवजी नगरपरिषद कर्मचाºयांकडे देण्याचे आदेश काढले आहे. आता टँकरसोबत नगरपरिषदेचा कर्मचारी वार्डात जाऊन पाणी वितरण करणार आहे. ज्या भागात पाणी पोहोचले नाही, त्या ठिकाणी पाणी वाटप करण्याला अग्रक्रम दिला जाणार आहे. यामुळे नगरसेवकांची नागरिकांकडून होणाºया त्रासातून सुटका होणार आहे.चापडोह प्रकल्पावर ४ ते ८ आणि १३ क्रमांकाच्या प्रभागाची भिस्त होती. परंतु हा प्रकल्प कोरडा पडल्याने आता या प्रभागासाठी अतिरिक्त टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. या भागासाठी दहा हजार लिटर टँकरची मागणी करण्यात आली होती. त्याचे टेंडर शुक्रवारी काढण्यात आले. परंतु दर अधिक असल्याने टँकर लावण्यासाठी पुन्हा मंजुरी घ्यावी लागणार आहे.पाणी वितरणासाठी मनुष्यबळाचा प्रश्नपाणी वितरण करण्यासाठी नगरपरिषदेकडे एवढे मनुष्यबळ आहे काय हा मोठा प्रश्न आहे. नगरपरिषदेला यासाठी चाचपणी करावी लागेल. तसेच टँकर पोहोचल्यानंतर विविध ठिकाणी भानगडी उपस्थित होतात. त्यामुळे अनेक कर्मचारी टँकरसोबत जाण्यास नकार देण्याचीही शक्यता आहे.नियंत्रण कक्षावर जिल्हा प्रशासनाचा वॉचपाणीटंचाई संदर्भात नगरपरिषदेत नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. हा कक्ष २४ तास आणि सातही दिवस उघडा राहणार आहे. या ठिकाणी नागरिकांना पाण्याच्या संदर्भातील तक्रारी नोंदविता येणार आहे. या कक्षावर जिल्हा प्रशासनाचे नियंत्रण राहणार आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई