शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
3
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
4
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
5
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
6
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
7
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
8
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
9
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
10
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
11
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण
12
"त्याला उचकी आली आणि...", 'अशी ही बनवा बनवी'मधील शंतनूचं असं झालं निधन, पत्नीचा खुलासा
13
वाद-प्रतिवाद सुरू असलेल्या भारताला आज स्वीकारमंत्र अंगीकारण्याची गरज -मोरारीबापू
14
Prithvi Shaw: सपना गिल विनयभंग प्रकरणात न्यायालयाने पृथ्वी शॉला ठोठावला १०० रुपयांचा दंड!
15
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
16
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
17
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
18
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
19
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
20
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल

पाण्याला आले सोन्याचे मोल, टाकीला लागले कुलूप

By admin | Updated: April 25, 2016 02:07 IST

लोटाभर पाण्यासाठी रात्रभर जागरण करावे लागत असल्याने पाण्याला आता सोन्याचे मोल आले आहे. पाण्याची चोरी होऊ नये म्हणून ....

टाकीवर लिहिले जाते नाव : पाण्यासाठी टँकरची प्रतीक्षा रूपेश उत्तरवार यवतमाळ लोटाभर पाण्यासाठी रात्रभर जागरण करावे लागत असल्याने पाण्याला आता सोन्याचे मोल आले आहे. पाण्याची चोरी होऊ नये म्हणून पाण्याच्या टाकीला कुलूप लावण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. एवढेच नाही तर पाण्यासह टाकी चोरीस जाऊ नये म्हणून त्यावर नावही लिहिले जात आहे. गत १५ दिवसांपासून पाणी टंचाईचाही दाहकता अनुभवणाऱ्या लोहाऱ्यात पाणी कडीकुलूपात बंद झाले. शहरालगत अशी अवस्था असले तर ग्रामीण भागात काय चित्र असेल याची कल्पनाही करवत नाही. यवतमाळ नगरपरिषदेत समाविष्ठ झालेल्या बहुतांश भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. लोहारा परिसरातही भीषण पाणीटंचाईचा सामना नागरिक करीत आहे. या भागातील विहिरी कोरड्या झाल्या आहे. हातपंपाला तासभर हापसल्यानंतर गुंडभर पाणी मिळणेही अवघड झाले आहे. अपुऱ्या नळ योजनेने केव्हाच अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे या भागातील तहान पाण्याच्या टँकरवरच अवलंबून आहे. टँकर केव्हा येईल, याची खात्री नसते. त्यामुळे नागरिक पाण्याची साठवणूक करीत आहे. पाणी साठविण्यासाठी नागरिकांनी घरासमोर प्लास्टिकचे ड्रम ठेवले आहे. टँकरमधून आलेले पाणी या ड्रममध्ये साठविले जाते. मात्र रात्रीच्या वेळी या ड्रममधील पाणी चोरीस जात असल्याचे काही नागरिकांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी यावर नामीयुक्ती योजली. प्लास्टिकच्या ड्रमला कडीकुलूप लावून घेतले. घरासमोर टँकर आला की कुलूप उघडायचे. ड्रममध्ये पाणी भरायचे आणि पुन्हा कुलूप लावायचे असा प्रकार सुरू आहे. सोन्यापेक्षाही पाण्याला अधिक महत्व आल्याचे यावरून दिसून येते. तसेच काही भागात पाण्याचे ड्रम चोरीस जाण्याची भीती असल्याने या ड्रमवर चक्क नाव लिहिले आहे. लोहारा परिसरात यावर्षी भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून येणारा प्रत्येक टँकर अवघ्या काही मिनिटातच रिकामा होतो. कितीही टँकर आले तरी येथे अपुरेच पडत आहे. एकंदरित पाणी म्हणजे जीवन असते याचा अनुभव आता या भागातील नागरिकांना येत आहे. लोहारा सारखीच अवस्था जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही असून पाणी विकत घेऊन तहान भागवावी लागत आहे.