शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

फौजदाराच्या मारेकऱ्याचाच पोलिसांवर ‘वॉच’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 21:56 IST

मारेगाव पोलीस ठाण्यातील सहायक फौजदाराच्या खुनातील आरोपी अद्याप सापडलेला नाही. तो जंगलातच असावा, असा दाट संशय असल्याने सुमारे २०० पोलीस त्याच्या शोधार्थ जंगलात विखुरले आहेत.

ठळक मुद्देमारेगाव पोलीस ठाण्यातील प्रकरण : दोनशेवर पोलीस जंगलात विखुरले

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मारेगाव पोलीस ठाण्यातील सहायक फौजदाराच्या खुनातील आरोपी अद्याप सापडलेला नाही. तो जंगलातच असावा, असा दाट संशय असल्याने सुमारे २०० पोलीस त्याच्या शोधार्थ जंगलात विखुरले आहेत. परंतु हा आरोपीच आता पोलिसांवर ‘वॉच’ ठेऊन स्वत: जंगलात सुरक्षित आश्रय घेत असल्याची बाब समोर आली.मारेगाव ठाण्यातील पोलीस पथकावर २५ नोव्हेंबरच्या मध्यरात्री हिवरी या गावी आरोपीने हल्ला चढविला. यात राजेंद्र कुडमेथे या सहायक पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू झाला तर अन्य दोन कर्मचारी गंभीर जखमी झाले. या हल्ल्यासाठी आरोपी अनिल मेश्राम (३५) रा.हिवरी याला त्याच्या आईने मदत केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अनिल अनेक महिन्यांपासून फरार असल्याने व त्याचा वॉरंट असल्याने पोलीस अटकेसाठी गेले होते. मात्र त्यांना आरोपीच्या हल्ल्याला सामोरे जावे लागले. या घटनेनंतर आरोपी अनिल त्याच रात्री पसार झाला. पोलिसांनी लगेच सर्वत्र नाकेबंदी केली. हिवरी परिसरात घनदाट जंगल, डोंगर-कपाऱ्या, तलाव आहेत. गुराखी असलेल्या अनिलला संपूर्ण जंगलाचा अभ्यास आहे. त्यामुळे तो पाच दिवसांपासून जंगलातच लपून असावा, असा संशय पोलिसांना आहे. म्हणून सुमारे २०० पोलिसांची फौज अनिलच्या शोधार्थ जंगल पालथे घालते आहे.अनिलचे रोहपट जंगलात लोकेशनबुधवारी दुपारी २ वाजता अनिलचे लोकेशन याच जंगलातील रोहपट भागात दिसल्याचे सांगितले जाते. त्यावरून अनिल हा रोहपट, सगनापूर, म्हैसदोडका या परिसरातील जंगलातच आश्रयाला असावा, असा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. २०० पोलिसांनी परिसराला वेढा घातला असल्याने अनिलला जंगलाबाहेर पडण्याची सोय नाही. त्यामुळे तो जंगलातच पोलिसांपासून बचाव करीत आहे.आता तोच पोलिसांवर ‘वॉच’ ठेवत असल्याची माहिती आहे. जंगलात त्याला पोलीस दिसताच तो स्वत:च सुरक्षित ठिकाणी आश्रय घेत असल्याचे सांगितले जाते. हल्ल्यात साथ देणाºया त्याच्या आईला मारेगाव पोलिसांनी लगेच अटक केली होती.जंगलात फिरताना पोलिसांची होतेय दमछाकगुराखी अनिलला जंगलात मिळेल ते खाण्याची व कुठलेही पाणी पिण्याची, तासन्तास पाण्याशिवाय राहण्याची सवय आहे. मात्र त्याच्या मागावर असलेल्या पोलिसांची चांगलीच दमछाक होते आहे. अनिलचे कुठलेही क्राईम रेकॉर्ड नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.विक्षिप्त अनिलने वडिलांवरही केला होता हल्लादारू पिणारे, शिवीगाळ करणारे, मोठ्या आवाजात बोलणारे यांचा त्याला प्रचंड राग होता. याच कारणावरून त्याने एकदा आपल्या पित्यालाही मारहाण केल्याची माहिती आहे. विक्षिप्त असल्यानेच गावकरी त्याच्यापासून चार हात दूर राहात होते, असे सांगितले जाते.

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिस