शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सांडपाणी निर्गुडा नदीच्या पात्रात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 23:28 IST

निर्गुडा नदीचा जलस्तर कमी असून याच नदीचे पाणी नळाद्वारे नागरिकांना पुरविले जात आहे. मात्र या नदीत वणी शहरातील दामले फैल व चिखलगावातील सांडपाणी सोडले जात असल्याने नदीतील पाणी दूषित होत आहे.

ठळक मुद्देआरोग्य धोक्यात : वारंवार तक्रारी करूनही वणी पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : निर्गुडा नदीचा जलस्तर कमी असून याच नदीचे पाणी नळाद्वारे नागरिकांना पुरविले जात आहे. मात्र या नदीत वणी शहरातील दामले फैल व चिखलगावातील सांडपाणी सोडले जात असल्याने नदीतील पाणी दूषित होत आहे. परिणामी या पाण्यामुळे पाणी टंचाईच्या काळात नागरिकांच्या आरोग्याला बाधा पोहचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.यासंदर्भात नागरिकांनी पालिका प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी केल्या. मात्र प्रशासनाने या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांना नळाद्वारे मिळणाऱ्या दूषित पाण्यावर आपली तहान भागवावी लागत आहे.यंदा कधी नव्हे ईतकी वणी शहरात पाणी टंचाई निर्माण झाली. वाढत्या तापमानाने वणी शहरातून वाहणाºया निर्गुडा नदीतील जलस्तर वेगाने घटला. यावर मात करण्यासाठी नगरपालिकेने शहरात टँकरने पाणी पुरवठा सुरू केला. सोबतच नवरगाव धरणातून ठरल्याप्रमाणे निर्गुडा नदीत सोडले जात आहे. मात्र त्याचे प्रमाण कमी असल्याने राजूर खाणीतील पाणीदेखील निर्गुडा नदीत सोडले जात आहे. मात्र पालिकेच्या अनास्थेमुळे शहरातील दामले फैल भागासह चिखलगावातील सांडपाणीदेखील नदीला येऊन मिळत असल्याने निर्गुडा नदीतील पाणी दूषित होत आहे. वणी शहरासाठी असलेल्या पाणी पुरवठा योजनेचे जलशुद्धीकरण केंद्र अतिशय अशक्त असून पाणी स्वच्छ करण्याची क्षमतादेखील या जलशुद्धी केंद्रात उरली नाही. केवळ शुद्धीकरणाचा फार्स केला जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सांडपाणी निर्गुडा नदीत सोडले जात असल्याने ईतके घाण पाणी जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध होत नसल्याने नागरिकांना विविध आजाराची लागण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सदर सांडपाण्याची व्यवस्था लावण्याची मागणी आहे.घाणीचा विळखानिर्गुडा नदीला वणी शहराची जीवनदायिनी म्हणून ओळखली जाते. दोन वर्षांपूर्वी काही समाजसेवींनी मिशन निर्गुडा नावाचे अभियान राबविले होते. या अभियानाअंतर्गत या नदीचे रुप पालटले खरे; मात्र नंतर या समाजसेवींनी या नदीकडे पाठ फिरविली. आजघडीला नदीचे काठ घाणीने अगदी बरबटले आहेत. नागरिक नदीच्या काठावर प्रात:र्विधीसाठी जातात.