शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वरोरा, कळमना बोगस बियाणांचे केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 21:53 IST

पर्यावरण व शेतीसाठी घातक ठरणारे बीजी थ्री हे बीटी कपाशीचे वाण आंध्रप्रदेश व गुजरातमधून वरोरा, कळमना मार्गाने वणी, झरी, मारेगाव या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या माथी हाणले जात असल्याची माहिती एका जाणकाराने ‘लोकमत’ला दिली.

ठळक मुद्देगुजरातमध्ये निर्मिती : नफेखोरीच्या लालसेतून शेतकऱ्यांची फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : पर्यावरण व शेतीसाठी घातक ठरणारे बीजी थ्री हे बीटी कपाशीचे वाण आंध्रप्रदेश व गुजरातमधून वरोरा, कळमना मार्गाने वणी, झरी, मारेगाव या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या माथी हाणले जात असल्याची माहिती एका जाणकाराने ‘लोकमत’ला दिली. उत्पादनाची कोणतीही खात्री नसलेले हे वाण कोणत्याही प्रकारची पावती न देता शेतकऱ्यांना विकले जात असून शेतकरीही भाबडेपणाने ते विकत घेत आहेत.यातून फसवणूक झाल्यास संबंधित शेतकऱ्याला कोणतीही कारवाई करता येऊ नये, यासाठी बनावट बियाणांचे विक्रेते बियाणे विकल्याचा कोणताही पुरावा मागे सोडत नाहीत. यातून आजवर अनेक शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. विशेष म्हणजे कृषी विभागाची बियाणांची या तस्करीवर करडी नजर असली तरी कृषी विभागाच्या डोळ्यात धूळ झोकून राजरोसपणे बियाणांची तस्करी सुरूच आहे. यापूर्वी मारेगाव येथील एका अण्णाला बोगस बियाणे प्रकरणात अटक करण्यात आली होती. आता मात्र थेट आंध्रातील एजंटच या भागात सक्रिय झाले असून कोणतीही मान्यता नसलेले हे बियाणे मान्यताप्राप्त बियाणांच्या तुलनेत कमी किंमतीमध्ये शेतकऱ्यांना विकण्यात येत आहेत. या बियाणांना आंध्रप्रदेशात मान्यता आहे. मात्र महाराष्ट्रात या बियाणांवर बॅन आणण्यात आले आहेत. असे असले तरी या बियाणांवर शेतकऱ्यांचा विश्वास असल्याने शेतकरीदेखिल या बियाणे लागवडीवरच भर देत असल्याचे दिसून येत आहे.वणीसह झरी, मारेगाव तालुक्यातही अशा प्रकारचे बनावट बियाणे विकल्या गेल्याचा कृषी विभागाला संशय आहे. गंभीर बाब ही की, बीजी थ्री म्हणून ओळखले जाणारे कपाशीचे वाण पर्यावरण व शेतीसाठी घातक असताना शेतकरी या बियाणांची लागवड शेतात करताना दिसतात. या बियाणांच्या झाडांवर थेट तणनाशक फवारले तरी झाडाला कोणतीही बाधा होत नाही. त्यामुळे निंदणाच्या खर्चाची बचत होते, असा शेतकऱ्यांचा अनुभव असला तरी या बियाणाला अद्याप कोणतीही परवानगी नसून त्याच्या विक्रीवर बंदी घातली आहे. तरीही त्याची मोठ्या प्रमाणावर विक्री होत आहे.बोंडअळीचे शेतकऱ्यांमध्ये अद्यापही धास्तीमागीलवर्षी वणी उपविभागात कपाशीवर बोंडअळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला. बोंडअळीवर नियंत्रण आणण्यासाठी शेतकऱ्यांनी विषप्रयोग केले. परंतु हा विषप्रयोग शेतकऱ्यांवरच उलटला. यंदाही शेतकऱ्यांच्या मनात बोंडअळीची धास्ती असून पुन्हा ही बोंडअळी कपाशी उद्ध्वस्त करेल काय, या प्रश्नाने शेतकरी चिंतेत आहेत.

टॅग्स :cottonकापूस