शहरं
Join us  
Trending Stories
1
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
2
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
3
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
4
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
5
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
6
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
7
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
8
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
9
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
10
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
11
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
12
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
13
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
16
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
17
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
18
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
19
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
20
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया

कर्मचाऱ्यांच्या शोधात गावकऱ्यांची शहरात भटकंती

By admin | Updated: September 28, 2015 02:50 IST

कर्मचाऱ्यांनी नियुक्त मुख्यालयी राहावे म्हणून शासन दरमहा घरभाडे भत्ता देते. मात्र हा घरभाडे भत्ता उचलूनही तालुक्यातील बहुतांश शासकीय कर्मचारी मुख्यालयाला दांडी मारतात.

मुख्यालयाचे वावडे : कर्मचारी उचलतात दरमहा घरभाडे भत्ता उमरखेड : कर्मचाऱ्यांनी नियुक्त मुख्यालयी राहावे म्हणून शासन दरमहा घरभाडे भत्ता देते. मात्र हा घरभाडे भत्ता उचलूनही तालुक्यातील बहुतांश शासकीय कर्मचारी मुख्यालयाला दांडी मारतात. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना शोधण्यासाठी गावकऱ्यांना शहरात भटकंती करावी लागते. त्यातच अनेक कर्मचारी ‘नॉट रिचेबल’ असतात. राज्य शासनाने सर्व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे निर्देश दिले आहे. मुख्यालयी राहून जनतेचे काम करावे, अशी अपेक्षा आहे. त्यासाठी दरमहा घरभाडे भत्ता दिला जातो. परंतु तालुक्यातील शासकीय, निमशासकीय कर्मचारी तर सोडाच शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक आणि आरोग्य कर्मचारीही मुख्यालयी राहत नाही. तालुक्यातील बहुतांश शिक्षक उमरखेड येथून जाणे येणे करतात. सकाळी उशिरा जायचे आणि सायंकाळी लवकर निघायचे, अशी त्यांची पद्धत आहे. कधी एकदाचे पाच वाजते याकडे त्यांचे लक्ष असते. त्यामुळे शिक्षकांचे शिकविण्याकडे दुर्लक्ष होत आहे. तलाठ्याचे काम शेतकऱ्यांना वारंवार पडते. परंतु तलाठी आपल्या साज्यात कमी आणि निवासस्थानी अधिक असतात. त्यामुळे सातबारा किंवा तत्सम कागदपत्रे लागली तर गरजवंताला त्याचा शोध घेत उमरखेडमधील शासकीय निवासस्थान गाठावे लागते. अनेकदा साहेब घरी भेटत नाही. त्यामुळे मोबाईल लावाव तर तोही नॉट रिचेबल असतो. ग्रामसेवक तर गावात कधी येतो हाच संशोधनाचा विषय आहे. विविध प्रमाणपत्रासाठी ग्रामसेवकाची गावकऱ्यांना गरज भासते. परंतु हा ग्रामसेवक कधी गावात भेटतच नाही. या सर्व प्रकाराला काही कर्मचारी अपवादही आहे. परंतु बहुतांश कर्मचारी शहरातच मुक्कामी आहे. मात्र आपण गावात राहत असल्याचे प्रमाणपत्र मिळवून दरमहा घरभाडे भत्ता घेतला जातो. (शहर प्रतिनिधी)