शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

भटक्यांचे बिर्‍हाड अद्याप पाठीवरच

By admin | Updated: June 8, 2014 00:11 IST

शासनाकडून भटक्या समाज बांधवांचे स्थलांतर रोखण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहे. मात्र आजही अनेक भटक्या जमातींमध्ये अशिक्षितपणा कायम असून भटक्या जमातीतील नागरिकांचे बिर्‍हाड

वणी : शासनाकडून भटक्या समाज बांधवांचे स्थलांतर रोखण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहे. मात्र आजही अनेक भटक्या जमातींमध्ये अशिक्षितपणा कायम असून भटक्या जमातीतील नागरिकांचे बिर्‍हाड पाठीवरच दिसून येत आहे. शासनाच्या विविध योजनाही त्यांच्यापर्यंत पोहोचत नसल्याचे वास्तव आहे.भटक्या जमातीची अनेक कुटुंबे राज्यात वास्तव्यास आहेत. त्यांची सदैव भटकंती सुरू असते. हाताला काम मिळेल, या आशेने अद्यापही त्यांची अविरत भटकंती सुरूच आहे. परिणामी असे भटके समाज बांधव विकासापासून कोसो दूर आहेत. विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या या भटक्या जमातीतील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. त्यासाठी त्यांच्यापर्यंत विविध शासकीय योजना पोहोचविण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र प्रत्यक्षात त्यांच्यासाठी असलेल्या शासकीय योजनांचा त्यांना लाभच मिळत नाही. वीतभर पोटाची टीचभर भूक शमविण्याकरिता अद्यापही त्यांना या गावातून त्या गावात भटकंती करावी लागत आहे.भटक्या जमातीतील नागरिकांना कुठेही राहायला जागा मिळत नसल्यामुळे कोणत्याही गावानजीकच्या रस्त्याच्या कडेलाच किंवा गावातील पडीत जागेवर तंबू ठोकून ते उन्हा-तान्हात कसेतरी वास्तव्य करतात. पडित असलेल्या मोकळय़ा जागेवर पाल बांधून त्यांचे वास्तव्य सुरू होते. त्याच पालात त्यांची चिलीपाली असतात. त्यांची या गावातून त्या गावात सतत भटकंती सुरूच असते. परिणामी त्यांच्या मुलांना शिक्षण मिळणेही कठीण झाले आहे. भटक्या जमातीतील अनेक चिमुरडी हातात ‘घण’ घेऊन कुटुंबाला मदत करतात. घणाचे घावच त्यांचे पोट भरते. शिक्षणाचा त्यांना गंधही नसतो.  ही मुले शिक्षणापासून कोसो दूर आहेत. उदरनिर्वाहासाठी गावोगाव भटकंती करणार्‍या भटक्या समाजातील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभच मिळताना दिसत नाही. एवढेच नव्हे, तर त्यानील अनेकांची मतदार यादीतही नावे नसतात. सतत भटकत असल्याने त्यांच्याजवळ कायमचा कोणताही पुरावासुद्धा नसतो. परिसरातील बर्‍याच गावांमध्ये मोठय़ा प्रमाणात भटका समाज वास्तव्यास आला आहे. त्यांना सतत कामाच्या शोधात या गावातून त्या गावात भटकंती करावी लागत आहे. परिणामी त्यांच्या चिमुकल्यांच्या शिक्षणाची पंचाईत होत आहे. शाळा हा शब्दच त्यांना कळेनासा झाला आहे.  सततच्या भटकंतीमुळेच भटक्या समाजात आजही अशिक्षितपणाचे प्रमाण अधिक आहे. लिहिता, वाचता येत नसल्याने त्यांना त्यांच्यासाठी असलेल्या योजनांचा लाभही घेणे दुरापास्त झाले आहे. विविध योजनांसाठी कुठे जावे, कुणाकडे दाद मागावी, असा प्रश्न त्यांना पडतो. योजनाच माहत नसल्याने त्यांना त्या योजनेचा लाभ मिळत नाही. परिणामी वार्षानुवर्षे हा भटका समाज अद्यापही भटकंती करीत फिरतच आहे. शासन आणि प्रशासनाने अशा भटक्या जमातींकडे लक्ष देऊन त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी करून घेण्याची खरी गरज आहे. त्यांनाही इतर मानवाप्रमाणे मानव म्हणून ओळख देण्याची नितांत गरज आहे. (कार्यालय प्रतिनिधी)