शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
2
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
3
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
4
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
5
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
6
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
7
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
8
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
9
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
10
नवा ट्रेंड! मूल नको, कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
11
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
12
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
13
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
14
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
15
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
16
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त
17
अंबानींच्या अँटिलियाला कडवी टक्कर! 'या' अब्जाधीश राजकारण्याची इमारत अँटिलियापेक्षा उंच आणि अलिशान
18
IAS Govind Jaiswal : लोकांनी खिल्ली उडवली पण 'तो' डगमगला नाही; रिक्षा चालकाच्या लेकाने IAS होऊन दिलं उत्तर
19
सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न; गोंधळ घालणाऱ्या 'त्या' वकिलाला काय शिक्षा होणार?
20
"गर्लफ्रेंडमुळे तीन वर्षे जगायला मिळाली, आता..."; नाशिकमध्ये विद्यार्थ्याने इंजिनिअरिंग कॉलेजमध्येच आयुष्य संपवलं

स्त्रीशक्तीच्या जागरात चिमुकलीच्या गळ््याला नख

By admin | Updated: October 7, 2016 02:36 IST

नवरात्रोत्सवात सर्वत्र स्त्रीशक्तीचा जागर सुरू असताना यवतमाळच्या वैद्यकीय महाविद्यालयात मात्र कौर्याने परिसीमा गाठली.

परिसीमा क्रौर्याची : चार मुलींच्या पाठीवर झाल्या जुळ्या मुली, शहर ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल यवतमाळ : नवरात्रोत्सवात सर्वत्र स्त्रीशक्तीचा जागर सुरू असताना यवतमाळच्या वैद्यकीय महाविद्यालयात मात्र कौर्याने परिसीमा गाठली. चार मुलींच्या पाठीवर जुळ्या मुलीच झाल्याने जन्मदात्यांनीच नवजात बालिकेच्या गळ््याला नख लावले. जगात पाऊल ठेवताच तिला यमसदनी धाडले. वंशाच्या दिव्याच्या हव्यासात घडलेल्या या कृत्याने शासकीय रुग्णालयाच्या भिंतीही नि:शब्द झाल्या. यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उमरखेड तालुक्यातील चिल्ली येथील एक महिला बाळंतपणासाठी दाखल झाली. तिने सोमवारी पहाटे ६.१५ वाजता १५ मिनीटाच्या अंतरात जुळ्या मुलींना जन्म दिला. चार मुलींच्या पाठीवर दोन जुळ्या मुली झाल्याने कुटुंब खिन्न झाले. नवागताच्या जन्माचा कोणताही आनंद चेहऱ्यावर दिसत नव्हता. त्यातच पहिल्यांदा जन्मला आलेल्या मुलीचे वजन कमी होते. निपचित दिसत असल्याने तिला बालरोग विभागातील अतिदक्षता कक्षात हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. मात्र अपेक्षा भंग झालेल्या पित्याने या कक्षात उपचारासाठी नेण्यास स्पष्ट नकार दिला. तसे लेखीही डॉक्टरांना दिले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मुली जन्माला आल्याचा तणाव दिसत होता. अशा तणावातच रात्र झाली. तोपर्यंत वजनाने कमी असलेल्या मुलीची हालचाल सुरू झाली. त्यावेळी या मुलींजवळ बाळंतीण आणि आजी होती. तर पिता प्रसूती वार्डाबाहेर झोपला होता. मुलीची हालचाल बंद झाल्याचे लक्षात येताच आजीने वार्डातील नर्सला सूचना दिली. नर्सने बालरोग विभागात जाण्याचा पुन्हा सल्ला दिला. तेव्हा पिता आणि आजी त्या मुलीला घेऊन बालरोग विभागात गेले. मात्र तेथे डॉक्टरांनी त्या चिमुकलीला मृत घोषित केले.यानंतर चिमुकलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. दुपारी प्राथमिक अहवाल आला. तिच्या गळ्यावर आवळल्याचे व्रण दिसून आले. चिमुकलीचा मृत्यू आजाराने नव्हे तर गळा आवळल्याने झाल्याचे शवविच्छेदन अहवालातही निष्पन्न झाले. त्यावरून पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर शेंडे यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यात अज्ञात व्यक्तीने चिमुकलीचा गळा आवळून खून केल्याचे नमूद आहे. पोलिसांनी तूर्तास या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असला तरी आरोपी मात्र निश्चित केला नाही. जन्मदात्यांवरच पोलिसांचा संशय असून पाठोपाठ झालेल्या मुलीमुळेच हे कृत्य केल्याच्या निष्कर्षाप्रत पोलीस आले आहे. (कार्यालय प्रतिनिधी) पाच मुलींच्या भविष्याचा प्रश्न नवजात मुलीचा गळा आवळल्याने चील्ली येथील दाम्पत्य आरोपीच्या पिंजऱ्यात उभे आहे. मात्र पोलींसासमोर गुन्हा दाखल करताना वेगळाच पेच निर्माण झाला आहे. नेमका गळा कुणी आवळला हे निश्चित नाही. मात्र जन्मदात्यापैकी कुणालाही आरोपी केले तरी इतर पाच मुलींच्या भविष्याचे पुढे काय, असा प्रश्न पुढे येत आहे. कर्तव्य की माणुसकी अशा पेचात नेमका कुणावर गुन्हा दाखल करावा हा प्रश्न शहर पोलिसांना सतावत आहे. या प्रकरणात सदर मुलीच्या पित्यावर कारवाईचा बडगा उगारल्या जाणार असल्याची माहिती आहे.