शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

सिंचन साहित्याच्या अनुदानाची प्रतीक्षा

By admin | Updated: May 14, 2015 02:19 IST

अनुदानाच्या आशेने खरेदी केलेल्या सिंचन साहित्याची रक्कम परिसरातील शेतकऱ्यांना अजूनही मिळाली नाही.

वडकी : अनुदानाच्या आशेने खरेदी केलेल्या सिंचन साहित्याची रक्कम परिसरातील शेतकऱ्यांना अजूनही मिळाली नाही. गेली वर्षभरापासून शेतकरी कृषी विभागाच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवित आहे. प्रत्यक्ष त्यांच्या पदरात ही रक्कम पडली नाही. कृषी साहित्य विक्री केंद्राचे संचालक या शेतकऱ्यांकडून रक्कम घेवून मोकळे झाले. आता मात्र शेतकऱ्यांना अनुदानासाठी चकरा माराव्या लागत आहे. कृषी विभागाने जाहीर केलेल्या योजनेचा लाभ घेण्यासाठी परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी बोअरवेल खोदले. या आधारे सिंचन करता यावे म्हणून कृषी विभागाच्या योजनेनुसार अधिकृत तुषार व ठिबक संच विक्रेत्याकडून या साहित्याची खरेदी केली. शेतात सिंचन सुरू झाले.मात्र अनुदानाची रक्कम अजूनही मिळालेली नाही.अल्पभूधारक शेतकऱ्याला ७५ टक्के तर साधारण शेतकऱ्याला ५० टक्के यानुसार अनुदान दिले जाणार होते. मात्र साहित्याची खरेदी संबंधित शेतकऱ्यांना विक्रेत्याकडून पूर्ण रकमेत करायची होती. शासनाचीच योजना असल्याने शेतकऱ्यांनी आडाचेदीड करून गोळा केलेल्या रकमेतून साहित्य खरेदी केले. परंतु कृषी सहायकांनी संच खरेदी केल्याची तपासणी प्रत्यक्ष शेतात जावून केली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित राहावे लागत आहे. (वार्ताहर)