शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

अभियांत्रिकी महाविद्यालये उघडण्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2020 5:00 AM

यवतमाळ शहरात जवाहरलाल दर्डा  अभियांत्रिकी महाविद्यालयात (जेडीआयईटी) यंदा ३३० जागा उपलब्ध आहे. जगदंबा महाविद्यालयात २७० तर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात ३३० जागा आणि पुसदच्या बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयात ३०० जागा आहेत. प्रत्यक्ष सीईटीचा निकाल लागल्यानंतर यावर्षी ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी होणार आहे. त्यानंतर मेरीट लिस्ट आणि महाविद्यालयांचे ऑप्शन उपलब्ध होईल.

ठळक मुद्देजिल्ह्यातील चारही अभियांत्रिकी महाविद्यालयांसह विद्यार्थ्यांना सीईटी निकालाचे लागले वेध

  लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यंदा कोरोनामुळे सीईटीचेही त्रांगडे झाले. त्यामुळे प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया आणि त्यानंतर प्रत्यक्ष वर्ग अध्यापन कधी सुरू होणार, याबाबत अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे. तर सीईटीचा निकाल घोषित होऊन प्रत्यक्ष अध्यापन करता यावे याची जिल्ह्यातील चारही अभियांत्रिकी महाविद्यालयांना प्रतीक्षा लागली आहे. यवतमाळ शहरात जवाहरलाल दर्डा  अभियांत्रिकी महाविद्यालयात (जेडीआयईटी) यंदा ३३० जागा उपलब्ध आहे. जगदंबा महाविद्यालयात २७० तर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात ३३० जागा आणि पुसदच्या बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयात ३०० जागा आहेत. प्रत्यक्ष सीईटीचा निकाल लागल्यानंतर यावर्षी ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी होणार आहे. त्यानंतर मेरीट लिस्ट आणि महाविद्यालयांचे ऑप्शन उपलब्ध होईल. या संपूर्ण प्रक्रियेला साधारण महिनाभराचा कालावधी लागणार असला तरी सीईटी सेलकडून अद्याप सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया बाकी असली तरी द्वितीय, तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग यापूर्वीच महाविद्यालयांनी सुरू केले आहे. मात्र प्रथम वर्षाचे अध्यापन सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांना फार कमी कालावधी मिळण्याची शक्यता आहे. 

नोव्हेंबरअखेर सीईटीचा निकालअभियांत्रिकी कभ्यासक्रमाची पहिली सीईटी १ ते ३० ऑक्टोबरदरम्यान घेण्यात आली. अतिवृष्टीसह अनेक कारणांमुळे अनेक विद्यार्थी वंचित राहिले. त्यामुळे ७नोव्हेंबर रोजी पुन्हा सीईटी घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल २८ नोव्हेंबरपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील प्रवेश प्रक्रिया राबविली जाईल.

अद्याप निर्देश नाही सध्या नववी ते बारावीच्या वर्गाबाबतच वरिष्ठ पातळीवरून निर्देश आले आहे. अभियांत्रिकी महाविद्यालये कधी सुरू करावी याबाबत अद्याप निर्देश नाही. त्यामुळे काही सांगता येणार नाही. - एम. डी. सिंहजिल्हाधिकारी, यवतमाळ 

टॅग्स :collegeमहाविद्यालयCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या