शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
3
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
4
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
5
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
6
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
7
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
8
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
9
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
10
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
11
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
12
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
13
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
14
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
15
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
16
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
17
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
18
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
19
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
20
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  

कंत्राटासाठी डीएफओंच्या रजेची प्रतीक्षा

By admin | Updated: December 1, 2014 23:00 IST

जिल्हा नियोजन विकास समितीच्या निधीतून वनविभागामार्फत जल व मृदा संधारणाची कोट्यवधी रूपयांची कामे काढण्याचा घाट रचला जात आहे. यवतमाळचे उपवनसंरक्षक दीर्घ रजेवर जाणार

यवतमाळ : जिल्हा नियोजन विकास समितीच्या निधीतून वनविभागामार्फत जल व मृदा संधारणाची कोट्यवधी रूपयांची कामे काढण्याचा घाट रचला जात आहे. यवतमाळचे उपवनसंरक्षक दीर्घ रजेवर जाणार असल्याची कुणकुण असल्याने ते रजेवर कधी जातात याची प्रतीक्षा सर्वांना आहे. मात्र यावेळी प्रथमच या कामांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस समर्थित कंत्राटदारांना डच्चू दिला जाणार आहे.झरीजामणीसह विविध तालुक्यांमध्ये मग्रारोहयोच्या कामांमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला. त्यामध्ये काही वनाधिकाऱ्यांवर गुन्हेही दाखल करण्यात आले. त्यामुळे कंत्राटदारांनी आपला मोर्चा नियोजन समितीच्या विकास निधीतून केल्या जाणाऱ्या जल व मृदा संधारणाच्या कामांकडे वळविला. गेल्या तीन वर्षांत यवतमाळ उपवनसंरक्षक कार्यालयांतर्गत येणाऱ्या वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या हद्दीतच नव्हे तर संपूर्ण यवतमाळ वनवृत्तातच कोट्यवधींची कामे करण्यात आली. त्यात वनविभाग ३० टक्के तर कंत्राटदार ७० टक्के असा वाटाही ठरला आहे. त्यामुळे यातील बहुतांश कामे कागदोपत्री झाली. त्यावर अनेकदा वावड्याही उठल्या. परिणामी यवतमाळ वनविभागाचे उपवनसंरक्षक प्रमोदचंद लाकरा यांनी या कामांना विरोध केला. त्यांचा हा विरोध अद्यापही मावळलेला नाही. त्यांच्या उपस्थितीत या कामांच्या प्रस्तावाला मंजूरात मिळणे शक्य नाही. ही बाब हेरून काही कंत्राटदार आणि वनाधिकारी व कर्मचाऱ्यांनी पर्यायाचा शोध चालविला होता. दरम्यान उपवनसंरक्षक लाकरा हे दीर्घ रजेवर जाणार असल्याची कुणकुण लागली. त्यांच्या अनुपस्थितीत प्रभारी डीएफओंकडून ही कामे निकाली काढण्याचा घाट रचण्यात आला आहे. प्रस्ताव लवकर तयार व्हावे, यासाठी वनाधिकारी व कंत्राटदारांकडून लगबग चालली आहे. विधानसभा निवडणुकीच्या अगदी अलीकडेपर्यंत ही कामे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस समर्थित कंत्राटदरांनीच केली. नव्हे तर राजकीय दडपणातून त्यांची मक्तेदारीच चालत आली. विधानसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाचे पारडे जड झाले. त्यामुळे आता त्यांच्याशी सलगी असलेल्या कंत्राटदारांनाच ही कामे मिळण्याचे संकेत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस समर्थीत कंत्राटदारांना या कामांमध्ये प्रथमच डच्चू मिळणार असल्याचे सांगण्यात येते. (स्थानिक प्रतिनिधी)