शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
2
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
3
एखाद्याला खासदार करायचं म्हटल्यावर करतो अन् पाडायचं म्हटलं तर पाडतोच' अजित पवारांची टोलेबाजी
4
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
5
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
6
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
7
ग्रावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी
8
"छोट्या गाडीतून आले म्हणून मला फिल्मफेअर सोहळ्यात अडवलं"; प्रसिद्ध अभिनेत्रीने केली बॉलिवूडची पोलखोल
9
ना दीपिका, ना कतरिना अन् नाही आलिया, सर्वात आधी या प्रसिद्ध क्रिकेटरच्या पत्नीच्या प्रेमात होता रणबीर
10
जुळ्या बहिणींचे जुळे गुण! दहावीमध्ये मिळवले सेम टू सेम ९६ टक्के, अनुष्का-तनुष्काचे दैदिप्यमान यश
11
5 महिन्यात 3 बैठका; भारत-अफगाणिस्तानची वाढती जवळीक, पाक सरकारची डोकेदुखी वाढणार
12
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीचा उपास सोडताना 'या' चुका टाळा नाहीतर उपासना जाईल वाया!
13
गेम कुठे फिरला? भारताने पाकिस्तानात डमी फायटर जेट घुसविली, अन् लष्कराला जे पाहिजे होते तेच झाले...
14
सतत धमकी देणाऱ्या पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त होऊ शकतात? राजनाथ सिंह यांच्या 'त्या' विधानाने उपस्थित केला प्रश्न
15
आम्ही भारतात गुंतवणूक करतच राहू; भारत सरकारला.., Apple चा ट्रम्पना मोठा झटका
16
सैन्याला मिळणार ₹50,000 कोटींचा बुस्टर डोस; ऑपरेशन सिंदूरनंतर सरकार तिजोरी उघडणार
17
Sankashthi Chaturthi 2025: मन अस्थिर, अशांत असेल त्याक्षणी म्हणा किंवा ऐका 'हे' गणेशस्तोत्र!
18
मुख्यमंत्र्यांनी कान टोचल्यानंतर मेहता नरमले; गेल्या दोन वर्षांपासून बंद पडलेले काशिगाव मेट्रो स्थानकाच्या जिन्याचे काम सुरु झाले
19
घर आणि गाडी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! RBI रेपो रेट ०.७५% ने कमी करू शकते; किती येईल EMI
20
भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठी अपडेट; १८ मेपर्यंत मुदतवाढ, पुन्हा डीजीएमओ चर्चेला बसणार... 

मासिक सभा निश्चितीसाठी सीओंच्या सवडीची प्रतीक्षा

By admin | Updated: December 18, 2015 03:00 IST

नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष आणि विषय समितीच्या सभापती निवडीनंतर पहिल्या मासिक सभेची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

महागाव नगरपंचायत : पहिल्या सभेची सर्वांनाच उत्सुकता, अतिरिक्त प्रभाराचा फटकामहागाव : नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष आणि विषय समितीच्या सभापती निवडीनंतर पहिल्या मासिक सभेची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. परंतु येथे कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने मासिक सभेच्या निश्चितीसाठी त्यांच्या सवडीची प्रतीक्षा लागली आहे. महागाव नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांचा प्रभार उमरखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रवीण मानकर यांच्याकडे देण्यात आला आहे. उमरखेड नगरपरिषदेच्या कामाचा आवाका मोठा आहे. २३ नगरसेवक अन्य पदाधिकाऱ्यांचा मोठा जनसंपर्क ठेवावा लागतो. २५ कोटींच्या जवळपास उमरखेड नगरपरिषदेची कामे सुरू आहे. या कामांच्या तुलनेत कोर्ट केसेसही सांभाळाव्या लागत असल्याने मानकर यांना फुरसद मिळत नाही. त्यातच आता महागाव नगरपंचायतीचा अतिरिक्त पदभार त्यांना देण्यात आला आहे. परिणामी महागावकडे यायला त्यांना वेळच मिळत नाही. महागाव नगरपंचायतीचा नव्यानेच संसार सुरू झाला आहे. सारेच नवखे असल्याने अनेक कामांची मोठी उत्सुकता लागली आहे. काम होत नाही म्हणून कोणी नगरसेवक कार्यालयात आला तरी मुख्याधिकारी आले नाही म्हटले की त्याला परत जावे लागते. नगराध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड होवून दोन आठवड्यांचा कालावधी उलटला. त्यांनाही आपल्या कामाची उत्सुकता लागली आहे. मुख्याधिकारी नसल्याने मासिक सभा आणि नव्या, जुन्या कामांचे नियोजन थांबले आहे. सर्वच प्रभागात काही अपवाद वगळता नगरसेवक आपल्या स्वत:जवळील पैसे खर्च करून स्वच्छता मोहीम, नाल्या सफाई, वृक्षलागवड आदी कामे घेत आहे. परंतु ठोस कामासाठी नियोजन आणि तरतूद करून प्रत्यक्ष काम करण्यासाठी मासिक सभेची मंजुरी आवश्यक आहे. त्यातच अनेकांना नाहरकत प्रमाणपत्र तसेच इतर कामेही अडकली आहे. महागाव शहराला पाणीटंचाईचा फटका बसत आहे. पाणीपुरवठा यंत्रणा ठप्प झाली आहे. २० हजार नागरिक आजही नागरी सुविधांपासून वंचित आहे. रोज एक लाख लिटर पाण्याची गरज भासत असूनही येथील पाणीपुरवठा करणारी यंत्रणा बंद आहे. शहरात जलशुद्धीकरण योजना कार्यान्वित करण्यात आली असून निकृष्ट कामामुळे ती सुरूच झाली नाही. त्यामुळे शहरातील नागरिकांना गढूळ पाणी प्यावे लागत आहे. स्वच्छता, आरोग्य, शिक्षण आदी प्रश्न निर्माण झाले आहे. सदर प्रश्न सोडविण्यासाठी नगराध्यक्षासह उपाध्यक्ष उदय नरवाडे, शैलेश कोपरकर, राजू राठोड, छाया वाघमारे, फिरोजाबी पठाण, आशा भरवाडे, बाळू कदम, मंदा महाजन, जयश्री नरवाडे, अरुणा चवरे, सीमा नरवाडे, नारायण शिरबिडे, संतोष गंधारे, सरस्वती राजनकर, हिना सुरैया, विनोद कोपरकर या नगरसेवकांना शहराच्या सर्वांगीण विकासाचे वेध लागले आहे. मात्र मुख्याधिकारी नसल्याने सर्वांचा नाईलाज होत आहे. (शहर प्रतिनिधी)