शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

रेती घाटांना लिलावाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 23:43 IST

यंदा चांगल्या पावसामुळे नदी-नाल्यांना किमान दोन चांगले पूर आले. परिणामी नदी-नाल्यांमध्ये उतकृष्ट प्रतिची रेती वाहून आली. मात्र या घाटांचे अद्याप लिलाव न झाल्याने सध्या वणी, मारेगाव, झरी व पांढरकवडा तालुक्यात तस्करांचा अक्षरश: धुमाकूळ सुरू आहे.

ठळक मुद्देमहसूल बुडतोय : वणी व पांढरकवडा उपविभागात तस्करांचा धुमाकूळ

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : यंदा चांगल्या पावसामुळे नदी-नाल्यांना किमान दोन चांगले पूर आले. परिणामी नदी-नाल्यांमध्ये उतकृष्ट प्रतिची रेती वाहून आली. मात्र या घाटांचे अद्याप लिलाव न झाल्याने सध्या वणी, मारेगाव, झरी व पांढरकवडा तालुक्यात तस्करांचा अक्षरश: धुमाकूळ सुरू आहे. त्यामुळे त्याचा महसूल विभागाला चांगलाच फटका बसत आहे.विशेष म्हणजे रेती घाट तस्करांकडून कुरतडले जात असले तरी कारवाया मात्र समाधानकारक नसल्याने कारवाई करणारी यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात सापडली. महसूल विभागातील कर्मचाºयांना हाताशी धरून हे तस्कर रात्रीच्या अंधारात शेकडो ब्रास रेती बिनबोभाटपणे पळवित आहे. यासंदर्भात महसूल विभागाला जाणिव असली तरी संबंधित कर्मचारी तस्करांच्या दावणीला बांधून असल्याने तस्करांचे आता फावत आहे. वणी तालुक्यात विदर्भा, निर्गुडा, वर्धा, झरी तालुक्यात पैनगंगा व पांढरकवडा तालुक्यात खूनी नदी आहे.यासोबतच वणी व पांढरकवडा उपविभागात नाल्यांचेही प्रमाण मोठे आहे. त्यातून गेल्या काही महिन्यांपासून रेतीची मोठ्या प्रमाणावर चोरी केली जात आहे. एखाद्याने तक्रार केल्यास संबंधित घाटावर जाऊन महसूल कर्मचाºयांकडून केवळ चौकशीचा फार्स केल्या जातो. मात्र प्रत्यक्षात कारवाई केली जात नसल्याचा अनुभव अनेकदा आला.असा प्रकार घोन्सा परिसरात घडला असल्याचे सांगितले जाते. घोन्सा परिसरातील विदर्भा नदी वाहते. यंदा या नदीला अनेकदा मोठा पूर आला. त्यामुळे या नदीमध्ये उत्कृष्ट प्रतीची रेती वाहून आली आहे. नेमकी ही बाब हेरून तस्करांनी या नदीतील अनेक घाटांवर डल्ला मारला. मात्र महसूल विभागाचे कर्मचारी वरिष्ठांना अंधारात ठेऊन प्रकरण जागीच ‘सेटल’ करीत असल्याची माहिती जाणकाराने दिली.उमरघाटच्या नाल्याचा ‘घाट’ तस्करांच्या घशातमारेगाव व वणी तालुक्याच्या सीमेवर परंतु मारेगाव तालुक्याच्या हद्दीत येणाºया उमरघाट येथील नाल्यात यंदा मोठ्या प्रमाणावर रेती वाहून आली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून तस्करांनी नाल्याचा हा घाट कुरतडणे सुरू केले. यासंदर्भात महसूल विभागाकडे तोंडी तक्रारीही झाल्या. परंतु कोणतीही ठोस कारवाई झाल्याचे दिसले नाही. घोन्सा परिसरातील एका तस्कराचे महसूल विभागातील एका वरिष्ठ अधिकाºयांशी असलेल्या मधूर संबंधातूनच संबंधित तस्कराने रेती चोरून नेण्यात ‘विजय’ मिळविल्याची चर्चा आहे.

टॅग्स :sandवाळू