शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

वाघोबाचा आधी बैलावर हल्ला, मग रस्त्यावरच मांडले ठाण...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2022 05:00 IST

बंडी वीरकुंड शिवारात पोहोचताच एक ढाण्या वाघ अचानक झुडपातून बाहेर येऊन तो बंडीच्या चाकाजवळ खोळंबला... वाघ दिसताच बैलबंडीत बसून असलेल्या सर्वांचीच भंबेरी उडाली.. काही कळायच्या आत वाघाने बैलबंडीच्या मागे बांधून असलेल्या बैलावर हल्ला चढविला. मात्र, शेतकऱ्याने प्रसंगावधान राखून त्या वाघाला हुसकावून लावले. शेतकऱ्याचे रौद्ररूप पाहून वाघाने किंचित माघार घेतली. मात्र, तो तास दीड तास रस्त्यावरच ठाण मांडून होता.

लोकमत न्यूज नेटवर्क वणी : सायंकाळी पाच वाजताची वेळ... शेतातील कामे आटोपून एक शेतकरी आपल्या आई-वडिलांना बंडीत बसवून घराकडे परत येण्यासाठी निघाला... यावेळी बंडीच्या मागे एक तिसरा बैल बांधून होता.. बंडी वीरकुंड शिवारात पोहोचताच एक ढाण्या वाघ अचानक झुडपातून बाहेर येऊन तो बंडीच्या चाकाजवळ खोळंबला... वाघ दिसताच बैलबंडीत बसून असलेल्या सर्वांचीच भंबेरी उडाली.. काही कळायच्या आत वाघाने बैलबंडीच्या मागे बांधून असलेल्या बैलावर हल्ला चढविला. मात्र, शेतकऱ्याने प्रसंगावधान राखून त्या वाघाला हुसकावून लावले. शेतकऱ्याचे रौद्ररूप पाहून वाघाने किंचित माघार घेतली. मात्र, तो तास दीड तास रस्त्यावरच ठाण मांडून होता. मागाहून पुन्हा आलेल्या एका बैलबंडीलादेखील वाघाने अडवून ठेवले. मंगळवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेची पंचक्रोशीत चांगलीच चर्चा आहे. मारेगाव कोरंबी येथील सचिन नागतुरे यांचे वीरकुंड शिवारात शेत आहे. सायंकाळी शेतीचे काम आटोपल्यानंतर ते त्यांच्या आई-वडिलांसह बैलबंडीने घराकडे परत येत होते. वीरकुंड शिवारात अचानक त्यांना वाघाने दर्शन दिले. केवळ दर्शनच नाही तर हल्ल्याच्या बेतात असलेल्या या वाघाने बैलबंडीच्या मागे बांधून असलेल्या बैलावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सचिन नागतुरे यांनी मोठ्या धैर्याने उभारीचा धाक दाखवत वाघापासून बैलाचा बचाव केला. वाघ बैलबंडीपासून २० फूट मागे सरकला. त्यानंतर त्याने त्याच रस्त्यावर ठाण मांडले. अर्ध्या तासानंतर नागपुरे यांच्या पाठोपाठ मारेगाव कोरंबी येथीलच संतोष काकडे हेदेखील त्यांच्या पत्नीसह बैलबंडीने याच मार्गे घराकडे परत येत असताना त्यांनाही या वाघाने दर्शन दिले. बैलबंडीपासून हा वाघ केवळ पाच फुटांवर बसून होता. मात्र, त्याने काही केले नाही. सावधगिरी बाळगत संतोष काकडे यांनी आपली बैलबंडी पुढे नेली आणि सुखरूप घर गाठले. या भागात सातत्याने व्याघ्रदर्शन होत असल्याने शेतीच्या कामावर परिणाम होत आहे.

मारेगाव (कोरंबी) भागात सातत्याने वाघाचा वावरवणी-घोन्सा मार्गावर वणीपासून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या मारेगाव (कोरंबी) शेतशिवारात गेल्या काही महिन्यांपासून वेगवेगळ्या भागात वाघाचा वावर आहे. त्यामुळे या परिसरातील गावकरी कायम दहशतीच्या वातावरणात जगत आहेत. एखाद्या भागात वाघ दिसला तर आठवडाभर शेतीची कामे खोळंबतात. त्यामुळे शेतकरी वैतागले आहेत. वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा, या मागणीसाठी मारेगाव येथील सरपंचांनी वनविभागाला निवेदन दिले होते. मात्र, वनविभागाने वाघाच्या बंदोबस्तासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या नाही, असा शेतकऱ्यांचा आरोप आहे. 

 

टॅग्स :Tigerवाघ