शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

Maharashtra Election 2019; देशात परिवर्तनाचा संदेश देण्यासाठी बाळासाहेब मांगुळकर यांना विजयी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 17:14 IST

ही निवडणूक परिवर्तनाची नांदी ठरावी व त्याचा संदेश यवतमाळातून जावा याकरिता काँग्रेसचे उमेदवार बाळासाहेब मांगुळकर यांना मतदान करा, असे आवाहन ज्येष्ठ अभिनेते व माजी केंद्रीयमंत्री शत्रुघ्न सिन्हा यांनी केले.

ठळक मुद्देशत्रुघ्न सिन्हा यांची यवतमाळात जाहीर सभा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : देशातील सत्ताधारी अहंकारी झाले आहेत. या नशेतच ते मनमर्जी करत आहेत. दादागिरी ही एकट्या यवतमाळची समस्या नसून देशाची समस्या आहे. ही निवडणूक परिवर्तनाची नांदी ठरावी व त्याचा संदेश यवतमाळातून जावा याकरिता काँग्रेसचे उमेदवार बाळासाहेब मांगुळकर यांना मतदान करा, असे आवाहन ज्येष्ठ अभिनेते व माजी केंद्रीयमंत्री शत्रुघ्न सिन्हा यांनी केले. ते येथील शिवशक्ती लॉनमध्ये आयोजित प्रचार सभेत बोलत होते.सामाजिक जबाबदारी व नवराष्ट्र निमार्णासाठी व्यस्त कार्यक्रमातून यवतमाळला आल्याचे सिन्हा यांनी सांगितले. यवतमाळातील उमेदवार हा अतिशय सामान्य असून सातत्याने जनसेवेचे काम करत असल्याची माहिती आमचे स्नेही विजय दर्डा व पत्रकार एस.एन. विनोद यांनी दिली. यवतमाळात दादागिरी, भूखंड घोटाळा, महिलांची सुरक्षा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या समस्या आहेत. येथील दादागिरीला राजकीय संरक्षण मिळत आहे. देश स्वतंत्र होऊन एवढे वर्ष झाले. त्यानंतरही हे काय सुरू आहे. ही दादागिरी यवतमाळात नव्हे तर केंद्रातही सुरू आहे. तेथील सत्ताधारी अहंकाराच्या नशेत बुडाले असून त्यांनी कुठलाही विचार न करता अचानक नोटबंदी केली. याने अनेक लोक बेरोजगार झाले. कारखाने बंद पडले. ज्या काळ्या धनासाठी नोटबंदी केली त्याचा खडकूही बाहेर आला नाही. हा निर्णय फसल्यानंतर जीएसटीची घोषणा केली. ही जीएसटी अजूनही अनेकांना समजली नाही. यात अनेकांचा व्यापार बुडाला. इतकेच नव्हे तर गुरुद्वारातील लंगरवरही जीएसटी लावायला मागेपुढे पाहिले नाही. ३७० वेळा जीएसटीमध्ये सुधारणा करण्यात आल्या. त्यानंतरही जीएसटीचा फायदा फक्त येथील ह्यसीएह्णनाच झाला. या कारभाराविरूद्ध आवाज उठविल्यानंतर त्यांनी मला ह्यबागीह्ण म्हणून संबोधले. माझ्या लेखी व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा, पक्षापेक्षा देश मोठा आहे. त्यामुळेच जनता व राष्ट्राच्या हितासाठी महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, इंदिरा गांधी, राजीव गांधी, राहुल गांधी यांच्या पक्षात आलो. सत्ताधारी देशातील भूकबळी, बेरोजगारी, शेतकरी, शेतमजुरांच्या समस्या यावर काहीच बोलत नाही. प्रत्येक प्रश्नाला ते सर्जीकल स्ट्राईक, बालाकोट, ३७० कलम रद्द हेच उत्तर देतात. याउलट इंदिरा गांधींनी त्यांच्या कार्यकाळात स्वतंत्र बांगलादेशाची निर्मिती केली, ९० हजार पाकिस्तानी सैनिकांना कैद केले, नंतर त्यांना सोडून दिले. त्यावेळी सेनेच्या व नेत्याच्या बहादुरीला सर्वांनीच सलाम केला. मात्र आज कुणी त्यावर चर्चा करत नाही. काँग्रेसने या देशाला आयआयटी, इंडियन मेडिकल कॉलेज यासह अनेक संस्था दिल्या. सरदार पटेल यांनी तर पक्षाच्या पलीकडे जाऊन काम केले. त्यामुळेच आज त्यांचे पुतळे उभारले जात आहे. ही सर्व उपलब्धी काँग्रेसची आहे. यांच्या कार्यकाळात तर देश हा भूकबळीमध्ये १०२ क्रमांकावर आहे. आपल्यापेक्षा श्रीलंका, बांगलादेश, पाकिस्तान या देशांची स्थिती चांगली आहे, ही सर्वांसाठीच शरमेची बाब आहे. जागतिक बँकेच्या अहवालानुसार देशाचा विकास दर पाच टक्क्यांवर आला आहे. नोटबंदी व जीएसटीमुळे भारताची अर्थव्यवस्था डबघाईला आल्याचे संकेत नोबल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ अभिजित बॅनर्जी यांनी दिले होते. माजी पंतप्रधान व जगविख्यात अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांनीसुद्धा सरकारला वारंवार सूचना केल्या मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. आज परिणामी तीन लाख रोजगार कमी होत आहेत. यावर केंद्रातील सरकार बोलायला तयार नाही. देशात असलेल्या विद्यापीठांमधील भारतातील एकाही विद्यापीठाचा उल्लेख होत नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनतेने आपल्या मुलांच्या भविष्याचा विचार करत सर्वसामान्यांचा उमेदवार असलेल्या बाळासाहेब मांगुळकर यांना विजयी करा, असे आवाहन शत्रुघ्न सिन्हा यांनी केले.या प्रचार सभेचे प्रास्ताविक बाळासाहेब मांगुळकर यांनी केले. त्यानंतर माजी आमदार कीर्ती गांधी यांनी मनोगत व्यक्त केले. माजी खासदार विजय दर्डा यांनी यवतमाळचा उमेदवार हा परिवर्तनासाठी उभा असल्याचे सांगितले. आम्ही कुणाची तक्रार करत नाही. परंतु जनतेने संधी दिली होती तेव्हा तुम्ही काहीच केले नाही. शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, पाण्याची समस्या, वाढती गुन्हेगारी या समस्या त्यांनी निर्माण करून ठेवल्या. आता परिवर्तनासाठी बाळासाहेब मांगुळकर यांना मतदान करा, असे आवाहन माजी खासदार विजय दर्डा यांनी केले.या सभेला ज्येष्ठ पत्रकार एस.एन. विनोद, काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा, राहुल ठाकरे, अरुण राऊत, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष वनमाला राठोड, सचिन नाईक आदी उपस्थित होते. संचालन प्रा. अजय कोलारकर यांनी, तर आभार काँग्रेसचे शहर अध्यक्ष नगरसेवक चंद्रशेखर चौधरी यांनी मानले.

टॅग्स :Shatrughan Sinhaशत्रुघ्न सिन्हा